Saturday, April 20, 2024
Homeकलानितीन आसयेकर यांचा सन्मान

नितीन आसयेकर यांचा सन्मान

महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महान संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकणभुमी. कोकणच्या जुन्या पारंपरिक संस्कृतीपैकी एक दशावतार. याच दशावतार कलेसाठी रविवार दि. १४ जानेवारी हा दिवस अतिशय कौतुकास्पद आणि सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलेला दिवस ठरला.

संत सद्गुरू देवावतारी बाळुमामांची भुमिका करुन रसिक नाट्यप्रेमींच्या हृदयी आपले स्थान करणारे अभिनयकुमार श्री नितीन आसयेकर यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन अर्थसंकेत संस्थेचे संस्थापक डॉ. अमित बागवे व सौ. रचना बागवे, सिनेमा थिएटर इंडस्ट्री होमेक मल्टिप्लेक्सचे डायरेक्टर श्री. अशोक नाईक, डॉ. पुर्वजा नाईक, मराठी अभिनेता व हास्यसम्राट शशिकांत केरकर, डॉल्बीवाल्या फेम श्री. नागेश मोर्वेकर, कवी-गीतकार दिपक कांबळी व आयोजक श्री. राजेश चंद्रकांत म्हापणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्याचवेळी श्री भुमिका देवी लोककला (मळगाव सावंतवाडी) दशावतार कलाकार मंडळींचा सत्कार मिनल महिला बहुउद्देशीय संस्थेने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या रंगमंचावर करण्यात आला.

नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथील नाट्यगृहात ‘संत सद्गुरू देवावतारी बाळुमामा’ या सध्या कोकणात तुफान गर्दीत नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरलेला हा नाट्यप्रयोग अभिनयकुमार श्री नितीन आसयेकर यांनी आपल्या श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळातील कलाकारांच्या साथीने मुंबई शुभारंभ प्रयोग आमंत्रित मान्यवरांसाठी सादर केला. नितीन आसयेकर फेन्स क्लब यांच्या सहाय्याने दशावतार प्रेमी श्री. राजेश म्हापणकर यांनी अध्यात्मिक वातावरणात आयोजित केला होता.

बाळुमामाच्या नावानं चांगभलं या एकत्रित जयघोषाने विष्णुदास भावे नाट्यगृह नाट्यरसिकांनी भक्तीमय केले होते. सुरेल संगीत साथ आणि सर्व कलाकारांची अभिनय क्षमता कार्यक्रमाचा दर्जा उत्तम करण्यास पात्र ठरला. या नाट्यमंडळाने सादर केलेला हा नाट्यप्रयोग म्हणजे नयनी रम्य, नयनी दृश्य ध्यानी मनी चिंतनी साठवी बाळूमामा स्वरूप मूर्ती, असं म्हणायला काही हरकत नाही.

रंगश्री ट्रिकसीन – नेरुर या कलाकार ग्रुपने रंगमंचावर रंगीबेरंगी प्रकाश योजनेद्वारे रंगाची उधळणच केली. नाटकात एक विलक्षण असं पाहण्याजोगे चित्र होतं ते सध्या आपली लोप पावत चाललेली लोककला ती म्हणजे झिम्मा फुगडी व बस फुगडी पण ही लोककला त्यांनी खूपच छान प्रकारे सादर करुन रसिकांची दाद मिळवली.

विशेष म्हणजे बाळुमामांची भूमिका ज्यांनी साकारली ते अभिनयकुमार श्री. नितीन आसयेकर. बाळूमामांच्या बोलण्यातली शैली त्यांच्यातला साधेपणा जशास तसा हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न करून सार्थ ठरविला व ही भूमिका अजरामर करून ठेवली असे म्हटले तर वावग ठरणार नाही.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ