नुकतेच प्रकाशित झालेले गोविंद पाटील लिखित “मुलं जमिनीवरचे तारे” बालकिशोर संग्रह निराधार बालकांना गोविंद पाटील यांनी भेट दिला.
लक्ष्मी शिवदास मोरे ही बाल शिक्षिका आय. टी. आय. परिसरात बॅट बनवून विक्री करणाऱ्याची कन्या आहे.
मागे दैनिकात लक्ष्मी मोरे ही आजूबाजूच्या झोपडीतील बालकांना बेरीज वजाबाकी लेखन वाचन रोज शिकवते. हे वाचून लक्ष्मीच्या वस्तीवर जाऊन दिवाळी निमित्ताने बालकांना वाचनानंद द्यावा यास्तव मुलं जमिनीवरचे तारे हा पंचावन्न कवितांचा बालकिशोर कविता संग्रह गोविंद पाटील यांनी भेट दिला.

तिने मनोगतातून सांगितले, यातील कविता मी बालदोस्तांकडून पाठांतर करून घेईल. त्यांना आनंदाने गोल गोल पिंगा घालायला लावील. हीच आमची आगळी वेगळी दिवाळी. काव्य संग्रह भेट मिळाला म्हणून आजपासून सुरू झाली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800