Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यनिश्चय

निश्चय

सासरचा उंबरठा चढताना
मनाचा ठाम निश्चय होता
वेगळ काहीतरी बनण्याचा
सुरेख संसार करण्याचा

त्या धरतीसारखे
ओझं पत्करण्याचा
कुणाच्या एका हास्यास्तव
सारे आयुष्य घालवण्याचा

पण घात झाला
मलाही संसारी
ठेच लागली
माझ्याच घरी
मी परकी झाली

पण माझाही एक मोठेपणा
कुणा सांगू मी
माझी व्यथा
कारण धरतीहूनही
श्रेष्ठ कोण असणार ?

जिला तिची व्यथा कळणार
म्हणूनच ठरवले
मुकाट बसायचं
सर्वकाही सोसायचं
सर्वांना माफ करायचं
आणि
अशांचाच विजय होतो
यांचेच गुणगान होते

धरतीलाही लाथाडण्याअगोदर
मुखातून सुर निघतो
कराग्रे वसते लक्ष्मी…

— : शिल्पा तगलपलेवार गंपावार
कॅमेन आयलँड. Cayman Islands
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

शिवाजी राजा महान

जन्मला महाराष्ट्रात माझ्या
कर्तुत्ववान छत्रपती शिवाजी राजा
माय बाप सात्विक शहाजी जीजा
शिवबाचा पुत्र शूरवीर संभाजी साजा

मिळाले बालपणी संस्कार घरात
जगात नाही कुणी थोर वा सान
खेळत असे लुटुपुटूची लढाई
सवंगड्याना एकत्र घेऊन

गुरु  दादोजी कोंडदेव शिकवी
घोडेस्वारी दांडपट्टा तलवारबाजी
आशीर्वाद मायभवानीचा भरभरुनी
घेतली शपथ स्थापना स्वराज्याची

अठरा पगड जाती केल्या जवळ
मावळे जमविले दऱ्या खोऱ्यात
गुण हेरले शिवबाने प्रत्येकाचे
आरमारही उभारिले समुद्रात

समजाविला अर्थ स्वराज्याचा
जिंकण्याची ठसविली जिद्द भारी
जमविली फौज लढवय्यांची
गनिमी काव्याची केली तयारी

विद्वान गागाभट्ट आले दूर उत्तरेतून
राज्याभिषेक सोहळा अलौकिक
ना भूतो भविष्यती रायगडावर
दुमदुमले चौघडे जमले राजे निमंत्रित

महापराक्रमी रणधुरंदर राजा शिवाजी
केले सुस्थापित अष्टप्रधान मंडळ
दिल्या जबाबदाऱ्या योग्यतेने वाटून
नाही कुणाच्या कारभारी ढवळाढवळ

आग्र्याची ती गोष्टच न्यारी
दिल्या शत्रूच्या हातावरी तुरी
घेतली मेण्यातून सुखरुप भरारी
केली संभाजीच्या रक्षणाची तयारी

रक्षणकर्ता होता स्त्री जातीचा
माय बाप शिवबा शेतकऱ्यांचा
पल्लविल्या त्याने आशा आकांक्षा
मान वाढविला सर्वत्र भगव्याचा

कल्याणच्या सुभेदाराची सून
मानिली आपुली माय -बहीण
साडी- चोळी अलंकार देऊन
दिले तिजला सन्मानाने धाडून

परकियांचे  सैन्य होते जबरदस्त
शक्ती पेक्षा युक्ती होती श्रेष्ठ
जेरीस आणिले त्याने शत्रूस
किल्ले घेतले एक एक लढून

विश्वगुरु सर्वांचा दूर दूर देशात
सन्मान करिती चरित्रे लिहून
अराजक आहे माजला या धरतीवर
घे जन्म शिवबा पुन्हा देवदूत होऊन

— रचना : डॉ. सौ. अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments