Wednesday, October 9, 2024

निषेध

मनाला त्रास होतो, साहवेना
व्यक्त व्हावे कसे तेही कळेना
कुणीही उठावे, वापरावे कसेही
लाडक्या परीला, कुणाच्याही मुलीला
काय करावे…? काय करावे…?
या नराधमांना कसे आवरावे ?

कसा जीव धसतो, भयानक कृतीला
पाहताना कुणाला, कणाकणाने मरताना
सलत नाही वेदना, दगडाच्या काळजाला
काय म्हणावे, मानवातील पशु वासनेला ?
काय करावे…? काय करावे…?
या नराधमांना कसे आवरावे ?

मारले अनेकांनी, गर्भाशयात मुलींना
जन्म वाटे नकोसा, जन्माआधीच अर्भकांना
घडत राहतात या घटना पुन्हा पुन्हा
कळेना त्या निरपराधांचा काय गुन्हा ?
काय करावे…? काय करावे…?
या नराधमांना कसे आवरावे ?

पीडितांचे चेहरे सतत दाखवतात माध्यमे
बलात्कार करणाऱ्यांचे का चेहरे लपवतात माध्यमे ?
आवर घाला पालकांना, वेदना देणाऱ्या रील्सना
प्रत्येकाने समज द्यावा आपल्या मुलांना
काय करावे…? काय करावे…?
या नराधमांना कसे आवरावे ?

पुढारी कुणी तर कुणी असोत धनदांडगे
न्यायाच्या दरबारी हजर करा ते लांडगे
किती जाळणार मेणबत्त्या मेणाच्या ?
बलात्कारी जाळा, पेटवून गोवऱ्या शेणाच्या
आम्ही फक्त निषेध करतो, न्यायाचे काय करावे ?
काय करावे…? काय करावे…?

— रचना : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. अतिशय वास्तववादी, मार्मिक कविता,,👌👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments