मानवी शरीरामध्ये
पाच ज्ञानेंद्रिये आहे
यातीलच महत्वाचा
डोळे जे हे जग पाहे //१//
ज्यांना नसतेच दृष्टी
नसे शक्ती पहाण्याची
करु अशांना नेत्रदान
गरज आहे काळाची //२//
सजीवांना मिळालेली
डोळे ईश्वर देगणी
सर्वांना मिळावे डोळे
हिच देवाला मागणी. //३//
दानात दान हे श्रेष्ठ
दुर करु अंधकार
करु आपण नेत्रदान
येईल उर्जा शरीरा //४//
मृत व्यक्तीची दृष्टी
देऊ गरजवंताला
करुया हे पुण्यकर्म
लागेल तो पहायला //५//
दानात दान श्रेष्ठ
आहे दान नेत्रदान
दानासह दात्याचीही
वर्णू महती काव्यातून //६//

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800