नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल वर पर्यटन विषयक लेख आणि लेखमाला नेहमीच प्रसिद्ध होत असतात. पण नेपाळ ला पर्यटन आणि तीर्थाटनासाठी गेलेल्या कवयित्री सौ शोभा कोठावदे यांनी चक्क त्यांच्या कवितेतून आपल्याला नेपाळ दर्शन घडविले आहे. या अभिनव उपक्रमाचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक
नेपाळ नगरी
अती बहुगुणी
सोळा मैत्रिणी
होणार गं सुनी
देवाचे दर्शन
कौतुके सोहळा
स्तुप शिकवण
क्षणभर लळा
शांती समाधान
अवर्णनीय जोडी
सख्यत्व दावी डोळा
मनी जपते गोडी
शितल नगरीत
मोह न अहंकार
हृदयाने सांगतो
भेटू तुज वारंवार
सहचारिणी शंकराची
सम भाव ठेवी मनी
जणू आले आप्तेष्ट
जाहली मनरमणी
मधू बोल अमृताचे
शिकवण देई सदा
नसे भेद भाव त्यात
गुण जपू नित्य सर्वदा
बालपण होई जागे
तुज पाहता क्षणी
विसरून कुरापती
देहे यातना न जाणी
आठवांचा येई पूर
काव्यातून येई सूर
जाऊ आपुल्या नगरी
मन न होईल दूर
चुकले काही क्षणी
अपराधा क्षमस्व
प्रेमात अश्रू सांगे
स्विकार हे तमस्व
खेळकर ही वृत्ती
नसे त्यात भान वय
साठी गेली जरी आज
भासला बाल समय
हसा, खेळा, नाचा
खिलाडी वृत्ती असो
मन कदापि न हो वृद्ध
प्रेम भाव नित्य ठसो
रिटायर्ड होई वय
परि शिकवी समन्वय
मायेची शाल श्रीफळ
गोडव्यात ते अद्वय
मायेची ही शाल
देई प्रेमाची ऊब
श्रीफळाची मधुरता
अंती शिकवी खुप

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अभिनव उपक्रमा अंतर्गत कवितेतून नेपाळ दर्शन सौ.शोभा ताईंनी उतम घडविले आहे.
धन्यवाद
गोविंद पाटील सर जळगाव.