प्रिय पुस्तकास….
आज फोनच्या काळातही तुला पत्र लिहित आहे…..
पण आनंदी होशील तूही,,
भावना मनापर्यंत पोचतील…
आठवतंय अगदी बालपण
मोठ्या अक्षरांतील चित्रांचं
काऊ, मोर, मनी म्याऊ
सारं उत्सुकतेने बघायचं….
शाळेत वेलांटी, उकार, अनुस्वार..
छोटे छोटे धडे….चित्रांकीत
कविता गायला खुप आवडे..
तुला दप्तरात कव्हर घालून
ठेवतांना, त्यावर स्वतःचं नाव, वर्ग…..
तुझी सोबत शाळेत वाटत असे स्वर्ग….
फुलपाखरू होऊन पंख लागले फुटायला….तुझंही स्वरूप लागलं रे मग बदलायला…
जादूतून, स्वप्न नगरीत तुझ्या कथेत लागलं रमायला…
बंदिस्त राजकुमारीला सोडवणारा…घोड्यावरून
दौडत येणारा राजपुत्र अवतरणारा….
कथेच्या, कवितेच्या भावनेत
मन तुडुंब भरून जाई…
कधी अवखळ प्रेमळ भाव
खुदकन एकटं हसू येई…
संसारात पडताच दुपारी कामानंतर तुझा विरंगुळा
कधी हाती पडशील ..तुझा
सुटलाच नाही कधी लळा…
वेगवेगळी तुझी रूपं समंजसपणे
वाचत गेली…केवढं अगाध ज्ञान तुझ्यात…चिंब त्यात भिजत गेली….
आता ही आयुष्यात निवांत पणी
तुच असतोस साथीला…वेळ कसा झरझर सरतो..तुझ्या सोबतीत असलेला…
रोज च असतोस सोबत पण
पत्रातून वाटलं सांगावं तुला
तुझ्या अक्षर, वाडःमयाची
साथ हवी शेवटीही मला….
📚📖📚📖
✍️ अरुणा दुद्दलवार. दिग्रस, यवतमाळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान आहे कविता