डाॅ. पी. व्ही सोहोनी फाऊंडेशन, धुळे तर्फे दिला जाणार्या अतिशय मानाच्या अशा ‘श्रमसाफल्य’ पुरस्काराने नुकतेच ‘पाणवठा’ आश्रमाच्या कार्याला सन्मानीत करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व १,५१,०००/- रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सौरभ मंगल कार्यालय, धोंडाईचा येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते.

आजपर्यंत माणसांसाठी काम करणार्या अनेक संस्थांना हा पुरस्कार मिळाला असून त्या यादीत पाणवठाच्या पिल्लांना समाविष्ठ केल्याचा अधिक आनंद झाला. आपण नेहमीच आश्रमाच्या कार्यात मदत केली आहे. आपणासारख्या हितचिंतकांमुळेच आश्रमाचे काम पुढे जात आहे. त्यामुळेच मिळणार्या सन्मानातही आपला समान हक्क मानून आपल्यासहीत सर्व सहकार्यांच्या वतीने आम्ही हा पुरस्कार स्विकारला आहे, अशी प्रतिक्रिया डाॅ. अर्चना व गणराज जैन, पाणवठा, बदलापूर यांनी व्यक्त केली आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800