Thursday, December 5, 2024
Homeलेखपालकत्व : एक कला - २४

पालकत्व : एक कला – २४

“जीवन शिक्षण”

संपूर्ण जीवनशैलीला प्रभावित करून त्याला विशिष्ट असा आकार देऊन व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला समाज प्रस्तुत करणारी अर्थात व्यक्तिमत्व घडवणारी प्रक्रिया म्हणजेच, ‘जीवन शिक्षण’ असं म्हणता येईल.
हे जीवन शिक्षण माणसाला कधी कुठे कोणत्या वयात मिळणार याचे नियम नसावे. कारण वयाचा आणि आयुष्याचा प्रत्येक टप्पा माणसाला जीवन शिक्षण देत जातं.पण तरी विशिष्ट वयात जीवन शिक्षण मिळालं तर पुढे येणारी आव्हाने पेलण्यासाठी एक तयारी होत जाते. मग नेमकं जीवन शिक्षण कसं कुठे मिळणार आणि कोणत्या वयात तर बाल्यावस्था हे उत्तर असूच शकतं आणि कसं ? कुठं ? या प्रश्नाला उत्तर म्हणून आपण पुढील चर्चा करू या.

पालक, बालक, शाळा, शेजारी आणि ती सगळी माणसं जी बालकांच्या संपर्कात येतात ती सगळीच आपल्या व्यवहारा द्वारे आणि वर्तनातून बालकांना जीवन शिक्षण देण्याची जबाबदारी अनाहूतपणे घेत असतात. बालक आपल्या समोर असताना किंवा सोबत असताना मग ते बालक कोणीही असू देत, आपण त्याच भान ठेवून आपल्या वागणुकीत बदल करतो का ? याचा थोडा अभ्यास केल्यास असं उत्तर मिळतं की, ते बालक आपल्या घरातलं असेल तर सगळ्या नियम अटी लागू होतात. आपण सार्वजनिक जागेवर वावरत असताना आसपास बालक आहे कळलं असताना माहिती असताना आपण खरंच आवर्जून आपलं वर्तन थोडं तरी बदलतो का. तर फार फार थोड्या प्रमाणात हे होत असावं.

एक छोटासा प्रसंग बघू या. रेल्वे स्टेशन वर अनेक प्रकारची माणसं वावरत असतात हे आपल्याला माहिती आहेच. एक सहा सात वर्षाची बालिका आपल्या आई बरोबर ट्रेन ची वाट बघत होती. तेवढ्यात तिथे काही माणसं एका तरुण तरुणी शी आवाज चढवून बोलू लागली. थोड्या वेळात त्यातल्या एक दोघांनी त्या तरुणीला सुरी दाखवून घाबरवयाचा प्रयत्न केला. एक दोघांनी तिचे हात धरले. त्यांच्याकडे सूरी असल्याने आस पास ची गर्दी पाऊल मागे घेऊ लागली. ती बालिका हे सगळं बघत होती. तिचे आई बाबा तिला घेऊन थोडे लांब गेले. बघता बघता त्या माणसांनी तरुणीवर सुरीने हल्ला केला आता मात्र लोक आणखीच मागे गेले. तरुणी मदतीसाठी सगळ्याकडे बघत होती पण कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही. नंतर कोणीतरी पोलिसांना कळवले असणार म्हणून पोलिस तिथे आले आणि मग त्या तरुणीला तिथून नेण्यात आले. त्या माणसांना पण पोलिस घेऊन गेले. तोवर तरुणीवर त्यांनी सुरीने बरेच वार केले होते. आपल्या आई बाबांचा हात घट्ट धरून उभी असलेली ती बालिका अतिशय घाबरली. या घटनेचा तिच्या बाल मनावर निश्चितच गंभीर परिणाम झाला.

बाल अधिकार, बालकांची सुरक्षा, त्यांच्यावर मानसिक भावनिक आरोग्यावर होणारे परिणाम यावर आपण कायम चर्चा करत असतो. पण आज या घटनेचा त्या बालिकेच्या एकूण जडण घडण होताना काय परिणाम होऊ शकतो याचे गांभीर्य आपण लक्षात घेऊ या. या बाबत पुढील लेखात आणखी काही घटनांचा उल्लेख करून या एक दुर्लक्षित विषयाकडे आपलं अवधान वेधण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !