अहिल्याबाई तत्त्वज्ञानी महाराणी विख्यात
पुण्यश्लोक राजमाता होळकर ज्ञात IIधृII
जन्म जाहला जामखेड-चौंडी खेड्यात
माता सुशीलाबाई पिता माणकोजी होत
पती खंडेराव होते वीर योद्धा प्रसिद्ध II1II
माळवा प्रांताच्या राजमाता शस्त्र पारंगत
माळवा प्रांत सांभाळीत श्र्वशुरांचे पश्चात
सैन्याचे नेतृत्व करती युद्ध निपूण II2II
न्यायदानासाठी अहिल्याबाई सुप्रसिद्ध
मंदिरे नद्या घाट बांधले भारत वर्षांत
उद्योजकता जपली रोजगार केला निर्माण II3II
महेश्वर इंदूर उजैनला बनवले सुंदर
द्वारका काशी वैजनाथांचा केला जीर्णोद्धार
सोमनाथी शिवमंदिर केले प्रस्थापित II4II
कल्याणकारी केले कार्य जपले प्रजाहित
आदर्श सम्राज्ञी किताब लौकिक महान
आदर्श पतिव्रता लोकप्रिय शिवभक्त II5II
— रचना : अरुण गांगल. कर्जत -रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800