इच्छापूर्ती महिला मंडळाच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने नुकतेच पुस्तकांचे हॉटेल येथे सखी काव्य संमेलन आयोजित करण्यात आले. या काव्य संमेलनात 30 कवयित्रींनी सहभाग घेतला आणि अतिशय सुरेख रचना सादर केल्या. कार्यक्रमासाठी हॉटेलच्या सर्वेसर्वा भीमाई जोंधळे, प्रवीणजी जोंधळे, ज्येष्ठ साहित्यिका सौ.रजणी वाणी, आणि इच्छापूर्ती महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष सरलाताई सोनजे प्रमुख पदी होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष पूजन आणि ग्रंथ पूजन या अनोख्या पद्धतीने झाली. यात वटवृक्ष आणि ज्ञानेश्वरी आणि स्वतंत्र भारताचे संविधान यांचे पुजन झाले.
भिमाई जोंधळेंच्या सुरेख प्रेरणादायी विचारांनी सर्वच प्रेक्षक भारावुन गेले. स्त्री शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. काव्य संमेलनानंतर सौ रजनी वाणींच्या उद्बोधक विचारांनी सर्व कवयित्री भारावून गेल्या.
कार्यक्रमासाठी इच्छापूर्ती महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा सौ विद्या सामनेरकर, नवहितगुज मंडळाच्या अध्यक्षा सौ उज्वला कोठावदे आणि विवाह संस्कृती मंडळाच्या अध्यक्षा सौ. रेखाताई कोतकर उपस्थित होत्या.
स्वागतगीत तसेच पसायदान कुमारी वरदा अमृतकारच्या गोड आवाजात झाले. सूत्रसंचालन सौ. सुजाता येवले यांनी केले.
कार्यकमासाठी इच्छापूर्ती महिला मंडळाच्या सर्व सभासद तसेच प्रवीणजी जोंधळे यांनी विशेष मेहनत घेतली. पुस्तकांइतक्याच पौष्टीक जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
खुप छान उपक्रम. पुस्तक वाचन ही काळाची गरज. नासिक मधिल आपल्या समाजातील कवयित्री साठी छान संधी . 🌹🌹🌹🌹🌹
छान कविता