“मृत्यूपत्राची आवश्यकता व उपयुक्तता“
“मृत्यू” ही कल्पना प्रत्येकाला दुःखदायी वाटली तरी मृत्यू हीच जीवनातील एक निश्चित घटना आहे. जीवनात अन्य कोणतीही गोष्ट घडेल वा घडणार नाही, पण मृत्यू मात्र निश्चित येणार यात शंकाच नाही.
भारतात पहिले मृत्यूपत्र इ.स. १७५८ साली केले असल्याची नोंद असली तरी नंतरच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत असल्याने एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या व्यक्तीची स्वतंत्र मिळकत नसल्यामुळे कुटुंबप्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली संपत्तीचे वाटप होत असे. कालांतराने विभक्त कुटुंब पध्दत सुरू झाली व पैसा हाच परमेश्वर मानण्यामुळे संपत्तीबाबत घरात वादविवाद सुरू झाले. त्यामुळे मृत्यूपत्राची आवश्यकता वाटू लागली
मृत्युपत्र म्हणजे आपल्या निधनानंतर आपल्या मिळकतीचे वाटप कसे व्हावे, यासंबंधी मृताने व्यक्त केलेली इच्छा. ‘कायदेशीर भाषेत’ मृत्युपत्र म्हणजे ते करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मिळकतीची व्यवस्था आपल्या मृत्युनंतर कशी व्हावी यासंबंधीच्या इच्छाबाबत कायदेशीररित्या केलेली उद् घोषणा होय.”
सध्या मी, माझी बायको व माझी मुलं इतके छोटे कुटुंब राहिले आहे. अनेकांना आई, वडिलांच्या जबाबदाऱ्या नको असतात. त्यामुळे संपत्तीबाबत वाद विवाद होतात, काही वेळा एखाद्या कुटुंबात तीन मुलं असतात. त्यापैकी एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी अथवा आजारपणा साठी जास्त खर्च केला जातोmmव त्यामुळे त्याची आर्थिक प्रगती खूप होते. अशावेळेस आई वडिलांना असे वाटत असते की आपल्या निधनानंतर ज्या मुलाच्या शिक्षणावर जास्त खर्चयू न झाल्याने त्या मुलाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्याला आपल्या निधनानंतर मिळकतीतील जास्त हिस्सा मिळावा. पण अशावेळेस मृत्यूपत्र लिहिले असेल व त्यात तसा उल्लेख केला असेल तरच त्यांच्या मनासारखे वाटप होते. अन्यथा कायद्याने अपत्यांना सारखे वाटप होते. गृह कलह टळावेत आणि कोर्टकचेऱ्या होऊ नयेत व आपल्या इच्छेप्रमाणेच आपली मालमत्ता आपल्या मृत्यूनंतर वाटली जाऊ शकते . यामुळे आपल्या पत्नीला कोणाच्याही मेहेरबानीवर अवलंबून राहावे लागणार नाही. ती सन्मानाने जगु शकेल अन्यथा तीला वृध्दाश्रमात सुध्दा रहावे लागेल.
मृत्युपत्र कायदेशीर करण्यासाठी अनेक बाबींची पूर्तता केलेली असणे आवश्यक आहे. ते स्टॅम्पपेपरवर करण्याची सक्ती नसली तरी सुरक्षित राहील आणि वारसांना वेळेवर मिळेल याची काळजी घेतली पहिजे. मृत्युपत्राची भाषा सुस्पष्ट असावी. ह्या संदर्भात श्री अरूण गोडबोले यांचे १७२ पानी पुस्तक जरूर वाचावे. १६० रुपये किंमत असलेल्या पुस्तकात मृत्यूपत्र कसे लिहावे याबाबत योग्य मार्गदर्शन केले आहे. ज्यांना मृत्युपत्र करायचे असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं.

अरूण गोडबोले हे उत्तम लेखक आहेत तसेच ते उत्तम वक्ते आहेत. सर्व ज्येष्ठ नागरिक संघ व इतर सामाजिक संस्था यांनी ह्या पुस्तकाचे लेखक श्री अरूण गोडबोले यांना व्याख्यानासाठी निमंत्रण देऊन त्यांचे पुस्तक खरेदी करून संग्रही ठेवावे ही अपेक्षा.
गुढीपाडवा नुकताच झाला आहे. आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. त्यानिमित्ताने शक्य असेल त्यांनी लवकरात लवकर मृत्यू पत्र तयार करण्याचा संकल्प करावा, ही अपेक्षा.

— परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
.
मृत्युपत्र हा अत्यावश्यक, तरीही अजूनही बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित विषय असल्याने, त्यासंबंधात मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिणारे ज्येष्ठ लेखक श्री.अरुण गोडबोले ह्यांचे आणि ह्या पुस्तकाचे महत्त्व ओळखून त्याची योग्य दिवशी दखल घेणारा,त्याचा परिचय करून देणारा लेख लिहिल्याबद्दल श्री. दिलीप गडकरी ह्यांचेही मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन.