Sunday, April 21, 2024
Homeबातम्या'पूर्णिमानंद' : आनंदात प्रकाशन सोहळा

‘पूर्णिमानंद’ : आनंदात प्रकाशन सोहळा

कवयित्री सौ पूर्णिमा आनंद शेंडे (कोल्हापूरे) लिखित , ‘न्यूज स्टोरी टुडे’ प्रकाशित, पूर्णिमानंद काव्यसंग्रहाचे नुकतेच जेष्ठ कवी श्री सतिश सोळाकुंरकर, के ई एमचे माजी अधिष्ठाता डाॅ अविनाश सुपे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. स्वाती सुपे, तसेच ‘न्यूज स्टोरी टुडे’चे संपादक मा.देवेंद्र भूजबळ व न्युज स्टोरी टूडे’च्या निर्मात्या, प्रकाशक सौ. अलका भुजबळ आणि प्रसिद्ध कवयित्री व गीतकार सौ. सुरेखा गावंडे यांच्या व रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत आनंदात संपन्न झाला.

विशेष म्हणजे एरवीच्या गंभीर वातावरणात हा कार्यक्रम न होता वक्त्यांनी केलेले कवितांचे रस ग्रहण, विविध कोट्या, शेरेबाजी, या सर्वांना रसिकांचा सतत मिळत राहिलेला उदंड प्रतिसाद यामुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत राहिली.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन सौ अलका भुजबळ यांनी केले. तसेच प्रकाशक म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्यामागची भूमिका त्यांनी विशद केली.

कवयित्री सौ पौर्णिमा शेंडे यांनी त्यांना कविता कशा सुचत गेल्या हे सांगून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्यांचे आभार मानले.

प्रारंभी चैताली साटम यांनी सर्वांचे स्वागत केले. तर गंधाली शेंडे यांनी आभार मानले.

कवयित्री सौ पौर्णिमा शेंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन, केक कापून अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व उपस्थित रसिकांनी पुस्तक विकत घेऊन या कार्यक्रमात एक नवीन पायंडा पाडला.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. खूप छान पूर्णिमा, तुझे काव्यसंग्रह.. खूप खूप शुभेच्छा🌹🌹

  2. ‘पूर्णिमानंद’ काव्यसंग्रह सौ पूर्णिमा आनंद शेंडे लिखित,’न्यूज स्टोरी टुडे ‘ प्रकाशित पुस्तक, अनेक मान्यवर व काव्यरसिक प्रेक्षकाच्या उपस्थितीत सोहळा संपन्न जाला.
    याचे श्रेय मी न्युज स्टोरी टुडे वेब पोर्टल चे संपादक माननीय श्री देवेंद्र भुजबळ व निर्मात्या
    सौ अलका भुजबळ यांना देत आहे कारण माझ्या कविताना लेखाला सतत त्यांनी प्रोत्साहित केले म्हणून मला कवितासंग्रह काढायचे धाडस करावेसे वाटले. आणि यासाठी मी आभारी आहे

    • धन्यवाद पूर्णिमा तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🤝🤝

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments