कवयित्री सौ पूर्णिमा आनंद शेंडे यांच्या “पूर्णिमानंद” या कविता संग्रहाची दखल आज, रविवार दिं.७ एप्रिल २०२४ च्या महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राच्या “स्वागत पुस्तकांचे” या लोकप्रिय सदरात सर्वोच्च स्थानी घेण्यात आली आहे. या बद्दल
महाराष्ट्र टाइम्स चे मनःपुर्वक आभार. कवयित्री सौ पुर्णिमा आनंद शेंडे आणि पुस्तकाच्या प्रकाशिका, न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशनच्या सौ अलका भुजबळ या दोघींचेही हार्दिक अभिनंदन.
“पूर्णिमानंद” चे कौतुक करतांना, महाराष्ट्र टाइम्स ने म्हटले आहे, “या कविता संग्रहामध्ये मृत्यू, आजारपण, वृद्धावस्था,
नातेसंबंध, अशा विविध विषयांवरील कविता आहेत .समजायला सोप्या अशा या कविता आहेत”
तसेच सुप्रसिध्द अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या आई म्हणजे उषाताई भावे या सुद्धा पूर्णिमानंद या काव्य संग्रहाचे मनापासून कौतुक करताना म्हणतात सर्व कविता म्हणजे एक संदेश आहे, कविता हळुवार पणे अंतर्मनाचा ठाव घेतात.
विशेष म्हणजे या पुस्तकातील अनेक कविता यापूर्वी आपल्या पोर्टलवर प्रसिध्द झाल्या आहेत.
पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या “जीवन प्रवास”, समाजभूषण १, समाजभूषण २ आणि “मी, पोलीस अधिकारी” या पुस्तकातील लेख माला ही न्युजस्टोरीटुडे पब्लिकेशन ने पुस्तक रुपात प्रकाशित केल्या असून त्या पुस्तकांनाही छान प्रतिसाद मिळत आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
खुप च छान विषय आहे.जसे मिक्स करावे.सगे, सोयरे, नवीन बाळांची पाऊलवाटा, गंमत जंमत, निसर्गाच्या,
विषयी, आणि आई चे महत्व, प्रेमळ, स्पष्ट दिसत आहे.
वृद्धावस्था, अशी कि, समजून घेण्यासाठी किती
आयुष्य गेले…….पुर्णिमानंद प्रकाशित झाले.
सहजच, समजून घेण्यासाठी, लहान,दोघांसाठी.
माझी आवडती मोठी ताई……