आज आपण उठता बसता पैसा, पैसा करीत असतो.कितीही पैसा मिळविला तरी पैश्याचा लोभ काही सुटत नाही. यातूनच युवा कवी मंगेश सावंत यांना “पैसा” ही कविता सुचली. त्यांचा “हा प्रकाश अस्मितेचा” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून विविध साहित्यिक उपक्रमात ते सक्रियपणे सहभागी असतात.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
– संपादक
पैशाचा अहंकार तू
करू नकोस मानवा,
पैसा टिकत नाही तू
तुझा मार्ग शोध नवा !!१!!
पैश्यामुळे माणूस हा
किती सोसतो अन्याय,
गरिबांना पैश्यामुळे
मिळाला नाही रे न्याय !!२!!
भुकेल्या पोटाला कधी
मिळाले का रे खायला,
पैश्याच्या जोरावर ते
लागले रे नाचायला !!३!!
गरिबांनी पैश्यापाई
आज हात पसरले,
आजचे ते नेते सारे
माणुसकी विसरले !!४!!
माणसाने माणसाचा
पैशापायी घात केला,
पैशाच्या नादातच तो
आज फासावर गेला !!५!!
पैश्यापाई तुझा पाय
नकोस देऊ घसरू,
नकोस मानवा आज
तू माणुसकी विसरू !!६!!
— रचना : मंगेश सावंत. पुस. ता.अंबेजोगाई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान वाटली कविता 👌👌👌