Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यप्रश्न

प्रश्न

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न असतात
काळा गोरा गरीब श्रीमंत
कुठलेच कुणाचेच प्रश्न साधे सोपे नसतात..
या प्रश्नाची उत्तरेही साधी सोपी सरळ नसतात
काही प्रश्नांना अनेक उत्तरे असतात
काही प्रश्नांना तर उत्तरेच नसतात!
काही प्रश्न समजायला देखील सोपे नसतात

प्रश्न तुमची दमछाक करतात
प्रश्न तुमची परीक्षा बघतात
प्रश्नाला जात नसते धर्म नसतो
काही प्रश्न शिखरा सारखे उंच
काही सागराच्या तळा सारखे खोल
खडतर असतो हा प्रवास
प्रश्नाचा तळ गाठण्याचा
प्रश्ना पर्यंत पोहोचण्याचा
प्रश्ना पासून उत्तरा कडे जाण्याचा

प्रश्नाचा वेध म्हणजे अंधाराची गुहा
निराशा चिंता ताण थकवा
भंकस सर्कस मौत का कुआ
शेवट नसलेला दुवा
प्रश्न म्हणजे मत्स्य वेध
चक्रव्यूह शिवधनुष्य
हा गणिताचा गुंता सोडविता सोडविता
हतबल होतो मनुष्य

प्रश्नांना गोंजरावे हृदयाशी धरून ठेवावे
समजून घ्यावे
प्रश्नाचाच एक भाग व्हावे
मग कळत नाही आपलेच आपल्याला
कधी कसे सोपे होतात प्रश्न
उत्तर कधी होतात प्रश्न !

प्रा डॉ विजय पांढरीपांडे

— रचना : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८