प्रसाद चिकित्सा धर्मादाय संस्था, गणेशपुरी चा ३० वा वर्धापन दिन २७ जुलै रोजी साजरा करण्यात आला. गेली ३ दशके तानसा खोऱ्यातील (ठाणे व पालघर जिल्हा) वंचित व आर्थिक दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक प्रगती साठी कार्यरत आहे.
प्रसाद चिकित्साद्वारे आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषी, पाणी व स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण, कला व हस्तकला इत्यादी आयामांवर समाज विकासाचे कार्य अविरत सुरु आहे.
वर्धापन दिनानिमित्त प्रारंभी प्रसाद चिकित्साच्या हॉस्पिटलमध्ये धन्वंतरी पूजेचे सकाळी आयोजन करण्यात आले होते. खेडोपाड्यात महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत याचे मुख्य कारण आर्थिक परिस्थिती असते. पैशांअभावी त्या महाग टेस्ट करू शकत नाहीत.यामुळे उदभवणाऱ्या संभाव्य धोक्यांना त्यांना सामोर जावं लागत. यात प्रामुख्याने गर्भ पिशवीचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग याचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आढळते.
म्हणून महिलांसाठी मोफत मॅमोग्राफी कॅम्प (स्तनांच्या कर्करोग तपासणीसाठी) तसेच पॅपस्मिअर व अदयावत HPV स्क्रिनिंग कॅम्प (गर्भ पिशवीच्या कर्करोगा ची तपाणीसाठी) शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच सर्व रुग्णांवर यादिवशी मोफत उपचार करण्यात आले.
प्रसाद चिकित्सा गेली ३ दशके अविरत समाज विकासाचे कार्य करीत असून ती पुढेही अशीच अविरत सेवा करत राहील अशी ग्वाही प्रसाद चिकित्साचे कार्यकारी व्यवस्थापक श्री. मिलिंद नरगुंद यांनी यावेळी बोलताना दिली..
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कांदिवली चे श्री. राज वर्मा, श्री. मोदी, डॉ. नीता दोदवाड व मुंबई ऑनकॉलॉजि सेंटर चे डॉ. प्रीतम काळसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामविकासाधिकारी, इतर प्रतिष्ठित लोक, ग्रामस्थ, पत्रकार बंधू व गुरुदेव सिद्धपीठ व प्रसाद चिकित्साचे सर्व अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
या सर्वानी प्रसाद चिकित्सा करीत असलेल्या कामाचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800