Saturday, July 27, 2024
Homeबातम्याप्रा.रुपेश महाडिक सन्मानित

प्रा.रुपेश महाडिक सन्मानित

कोकण ग्राम विकास मंडळातर्फे दिला जाणारा “आदर्श अध्यापक पुरस्कार – 2024” नुकताच विद्या प्रसारक मंडळाच्या के.ग.जोशी कला आणि ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा.रुपेश महाडीक यांना मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात गप्पागोष्टीकार श्री.जयंत ओक यांच्याहस्ते नुकताच प्रदान
करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन तेजस्वी फाउंडेशन या नामांकित संस्थेने केले होते.

अल्प परिचय

विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि डॉ.महेश बेडेकर यांच्या आशीर्वादाने तसेच प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांच्या प्रोत्साहनाने प्रा.रुपेश महाडीक सर विद्यार्थ्यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबवीत असतात. विद्यार्थ्यांशी मनाने जोडलेले प्राध्यापक म्हणून त्यांचे सर्वजण कौतुक करतात. विद्यार्थी आहेत म्हणून आपण आहोत, या सकारात्मक जाणीवेचा दिवा हृदयात सतत तेवता ठेवणारे प्रा.महाडिक एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक आहेत.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण, सोबतच सेट, नेट आणि एलएलबी चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विद्यार्थीप्रिय पण त्याचसोबत शिस्तप्रिय असणारे प्रा.रुपेश महाडीक हे गेले १४ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासूनच अनेक स्पर्धा उपक्रमांमध्ये त्यांनी आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, नृत्य, नाटक, पथनाट्य, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमधून त्यांनी उत्तम यश प्राप्त केले. मुंबई विद्यापीठाच्या उडान या कार्यक्रमात सरांनी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनय केलेल्या स्किटला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले होते. अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत त्याचसोबत नावाजलेल्या विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे नाते नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण, संकट असो, त्यांना हमखास मार्गदर्शन मिळेल या विश्वासाने अनेक विद्यार्थ्यांनी सरांकडे धाव घ्यावी आणि अगदी गोवर्धन करंगळीवर लीलया उचलावा तसे विद्यार्थ्यांना संकटातून, समस्येतून मार्ग सहज दाखवावा अशा प्रकारचे भावबंध त्यांचे राहिले आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा, कुटुंब-समाज यांचा समतोल राखत उत्तुंग यश प्राप्त करावे, आत्मविश्वासाने, संयमाने परिस्थितीवर मात करत माणूस म्हणून चांगले आयुष्य जगावे, त्याचसोबत मैत्रीचे जीवनातील महत्त्व, अशा अनेक गोष्टींचे सिंचन विद्यार्थ्यानमध्ये करत आदर्श संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य सर अव्याहतपणे गेली अनेक वर्ष करत आहेत. विद्यार्थी चुकला तर त्याला खडे बोल सुनावत, नैतिकतेची जाणीव करून देणारे सर, मुलांना फणसासारखे वाटतात. वरून काटेरी पण आतून गोडवा असणारे आमचे सर.. अशी त्यांची ओळख विद्यार्थी करून देतात. कोणत्याही कार्यात सरांसोबत त्यांचे विद्यार्थी स्वतःला वाहून घेतात. त्यामुळेच विविध कार्यक्रमांचे आयोजन, उपक्रम अगदी सहज राबवले जातात.

सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमात सरांनी १०० हून अधिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचसोबत गणेशोत्सव स्पर्धांसाठी संहिता लेखन आणि गणेशोत्सव देखाव्यांना आवाज देत सुंदर केले आहे.

सर अध्यापनाचे कार्य करत असलेल्या जोशी बेडेकर महविद्यालयात एम ए मराठी विषय सुरू झाला असून प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक तसेच विभागप्रमुख डॉ.संतोष राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम आयोजन आणि कार्यक्रम राबवले जात आहेत. या वर्गासाठी ७० वर्षाचे अर्ध्वयु ही विद्यार्थी म्हणून प्रवेश घेत आहेत.
सरांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८