Saturday, July 27, 2024
Homeबातम्याप्रा. विजय तापस : मदतीचे आवाहन

प्रा. विजय तापस : मदतीचे आवाहन

दिवसेंदिवस वैद्यकीय खर्च इतका अवाढव्य वाढत चालला आहे की, केवळ गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीय व्यक्तींपुढेही जगावे की मरावे ? असा प्रश्न पडत चालला आहे.

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे रुईया महाविद्यालयातील मराठीचे निवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ समीक्षक, संपादक विजय तापस यांच्या मदतीसाठी हे कळकळीचे आवाहन करावे लागत आहे.

प्रा विजय तापस यांना लंग्जच्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने गाठलं आहे. गेले चार महिने या उपचारासाठी त्यांचा जवळपास तीस लाख रुपये खर्च झाला आहे आणि अजून पस्तीस लाखाच्या आसपास खर्च येणार आहे. आता लोकांच्या मदतीशिवाय पुढील उपचार करणे अत्यंत कठीण झालं आहे. त्यांना सध्या तरी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळू शकत नाहीये. तरी आपण त्यांच्या उपचारांसाठी सढळ हस्ते मदत करावी ही विनंती. पुढे त्यांचे बॅंक अकाउंट डिटेल्स दिले आहेत. आपण सर्वांनी यथाशक्ती मदत केलीत तर त्यांचे कुटुंबीय, स्नेही, मित्र मंडळी आपले कायमचे ऋणी राहतील.

अल्प परिचय
प्रा विजय तापस यांचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे संशोधनावर आधारित अभ्यासपूर्ण लेखन हे होय. मराठीतील सर्व प्रमुख वृत्तपत्रांतून त्यांनी साहित्य-कला- संस्कृतीच्या संदर्भात सदरलेखन केले आहे. साहित्य-संशोधक, संपादक, नाट्यसमीक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. २०२२ मध्ये लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत विस्मृत नाटकांवर लिहिलेली त्यांची लेखमाला ही सामाजिक दस्तऐवजाचा उत्तम नमुना म्हणून आहे. २०२३ मध्ये त्यांनी संपादित केलेला ‘सत्यकथा निवडक कविता या दोन खंडांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

तसेच अलीकडेच त्यांनी मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सृजनव्रती’ या प्रा. श्री. पु. भागवत यांच्यावरील ग्रंथाचे मोनिका गजेंद्रगडकर यांच्या बरोबरीने संपादन केले आहे. नव्याजुन्यातील जे जे उत्तम आहे, ते स्वीकारुन अभ्यासोनी प्रगटावे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. यातूनच त्यांनी आफ्रो-अमेरिकन कवयित्री माया ॲंजेलोच्या कवितांचा भावानुवाद केला आहे, तर एकीकडे शंकराचार्यांच्या स्तोत्रांना मराठीचा साज चढवताना त्यांचं रुपांतर स्वतंत्र काव्यात केलं आहे. या निवडक स्तोत्र जागराचं ‘देवगान’ हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.

प्रा विजय तापस यांचा विठ्ठल हा खास जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्या शब्दांतून विठ्ठल आणि त्याचे भक्त आपल्याला वेगळ्याच रुपात भेटतात. विठ्ठलावर त्यांनी केलेली कविता आपल्याला नक्कीच भावेल. ती पुढे देत आहे.

पोरकेपणाचा सन्नाटा

तू गेलीस त्यालाही बख्खळ काळ लोटला
का ग जनी ?
आताशा वाहत्या काळाची संगती
थोडी धुवटच झाली बघ माझ्यासाठी…
तुला जाऊन शतकं उलटली म्हणतेस ?
मग अजूनही कशी दिसतेस ग मला
आषाढी कार्तिकीच्या महामूर गर्दीत ?
तीच रापलेली काया
मुखड्यावर तीच उदासी,
थकव्यात बुडलेली भेगाळलेली पावलं
नजरेत मात्र दवात न्हाल्या गवताची धुंदी
अगदी जशीच्या तशी….

या तुझ्या नजरेनंच हृदयठाव घेतला माझा
आता खोटं का बोला…
मग व्हायचं ते झालं माय
तुझं अंगण
तुझं वावर
तुझा खराटा
तुझी भांडीकुंडी
तुझी धुणी
तुझी चूल
तुझी भाकर
तुझं मन
अन् तुझा श्वास
सगळं माझं झालं माझंच असल्यावाणी…

मला तुझी संगत हवीशी झाली
का तुला माझी, कधी कळलंच नाही बघ!
एक सांगू जने, मला तुझे शब्द कधी होता आलं नाही
ते तुझेच राहिले बघ त्यातल्या आकांतासकट
शतकं उलटली तरी…

माय, जन्माची शिंपीण तू
तरी जगण्याच्या फाटक्या नेसूला
दांड घालू शकली नाहीस
अन् मी असा करंटा,
तुझ्यासाठी सुई होऊ शकलो नाही…

तू गेलीस ती गेलीसच बघ
काकड आरती संपता संपता
अन् शेजारी बांध फुटला रुक्मिणीच्या मनाचा
तेव्हापासून उभाय् माय
पोरकेपणाचा सन्नाटा हृदयात भरुन…
पोरकाच होऊन !
— विजय तापस

अशा या साहित्य तपस्वी असलेल्या प्रा विजय तापस सरांसाठी आपण आपली मदत पुढील बँक खात्यात जमा करू शकता.

Beneficiary :
Shabda Vijay Tapas
Vijay Waman Tapas

Bank : The COSMOS Co.op. Bank Ltd.
Branch – Vileparle East, Mumbai 400057

•IFSC code : COSB0000017
•MICR code : 400164003

•A/c type : Saving account
•A/c No. : 01705010213998

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा ही कळकळीची विनंती.

यासंदर्भात आपल्याला काही शंका असल्यास आपण प्रा. विजय तापस यांच्याशी 9819266926 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, ही विनंती.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८