कचरा वेचक महिलांसाठी काम करीत असल्याबद्दल प्रा वृषाली मगदूम यांना तर हुंडा बंदीसाठी सतत कार्य करीत असल्याबद्दल आशा कुळकर्णी यांना अप्रतिम गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या व राज्याच्या विविध भागात विविध कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्या पुरस्कारांचे वितरण काल पहिल्या महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषदेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्याहस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे प्रदान करण्यात आले.
काही अपरिहार्य कारणामुळे या दोघीही यावेळी उपस्थित राहू शकल्या नाहीत. म्हणून प्रा वृषाली मगदूम यांचा पुरस्कार निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी तर आशा कुळकर्णी यांचा पुरस्कार निवृत्त दूरदर्शन निर्माते राम खाकाळ यांनी स्वीकारला.

यावेळी अप्रतिम मीडिया फाउंडेशन चे प्रमुख डॉ अनिल फळे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दिवसभर आयोजित विविध चर्चासत्रात विकास या विषयावर सांगोपांग विचार विनिमय करण्यात आला.

परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ रवींद्र कुळकर्णी यांनी केले. तर समारोपाच्या भाषणात डॉ भागवत कराड यांनी भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन सर्व सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी विकास कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
— टीम एनएसटी. ☎️ 9876484800
salute and best wishes to awardees