Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यप्रेमा तुझा रंग कसा…

प्रेमा तुझा रंग कसा…

रंग ज्याचे विलक्षण
प्रेम रंगात रंगले ।
दोन मन एक प्राण
त्याच मिलनी दंगले ।।१।।

माय मायेची सावली
प्रेम ममत्वात जसे ।
नाते बहीण भावाचे
कृष्ण सुभद्राचे असे ।।२।।

रंग मित्रत्वाचा पहा
कृष्ण सुदामा भेटले ।
शैशवाचे संवगडी
जिथे विश्वास जिंकले ।।३।।

दोन तन एक मन
भार्या सखी जीवनाची ।
विरहात जळताना
ओढ वाटे मिलनाची ।।४।।

प्रेम असे ईश्वराचे
भक्तालाच उमजते ।
श्रद्धा मनात रुजता
सत्य हे उलगडते ।।५।।

अरुण पुराणिक

— रचना : अरुण पुराणिक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments