सहाक्षरी रचना
फक्त तुझ्यासाठी
आता रे जगते
तुला वाचवण्या
प्रयत्न करते…१
निसर्ग सुंदर
हिरवा ठेऊ या
तन मन धन
त्यालाच अर्पू या…२
सहस्त्र बाजूंनी
समृद्ध ही सृष्टी
आपण जगाया
आली नवदृष्टी….३
काढू प्रदूषण
सरिता नितळ
पुन्हा वाहतील
ओढे खळखळ…४
डोंगर वाचवू
नको वृक्षनाश
आपली ती चूक
जीवनाला पाश…५
जगू तुझ्यासाठी
करू तुझे कार्य
नव्या पिढीसाठी
स्विकारू सत्कार्य…..६
— रचना : अरुणा दुद्दलवार. दिग्रस, यवतमाळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
नमस्कार ,खरेच पर्यावरणसंवर्धन कर्तव्य मानवाचे