Thursday, May 30, 2024
Homeबातम्याफातिमाबी शेख संमेलन थाटात संपन्न

फातिमाबी शेख संमेलन थाटात संपन्न

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाले.

सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी कुरान पठन करून संमेलनाची सुरुवात केली. यानंतर डॉ अजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील लेखिका प्रा. डॉ. अर्ज़िनबी युसुफ शेख या होत्या.यावेळी मंचावर स्वागताध्यक्षा सौ. सुरैय्या जहागीरदार, डॉ. अजीज नदाफ, मुख्य संयोजक प्राचार्य इ.जा. तांबोळी, अय्यूब नल्लामंदू, प्राचार्य शकील शेख, अनिसा शेख, अॅड. हाषम पटेल, मुस्लीम कबीर, कवी मुबारक शेख, सय्यद अलाऊद्दीन आष्टी, सायराबानू चौगुले – रत्नागिरी, खजीनदार हसीब नदाफ इ उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते इंतेखाब फराश संपादित “स्पंदन” आणि इ. जा तांबोळी व अय्यूब नल्लामंदू संपादित काव्य संग्रह “गुलदस्ता” व खाजाभाई बागबान लिखित काव्यसंग्रह “आयुष्याच्या वाटेवर उमटलेल्या पाऊलखुणा” व “क्षणभंगूर हे जीवन” या काव्यसंग्रहाचे व सायराबानू चौगुले लिखित “वैचारिक कवडसे” या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले .

यानंतर बेन्नूर फौडेशनच्यावतीने मुबारक शेख यांना फखरोदीन बेन्नूर स्मृती पुरस्कार, तर फराश फौंडेशन तर्फे प्राचार्य तांबोळी यांना समाजरत्न पुरस्कार आणि शाहिदा सय्यद यांना ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने युगस्त्री फातीमाबी शेख साहित्य पुरस्कार -२४ सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.

शफी बोल्डेकर यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्षा डाँ .सौ सुरैय्या जहागीरदार यांनी सर्वांचे स्वागत करत शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व आपल्या स्वागत अध्यक्ष भाषणाचा सारांश सादर केला. दोन्ही संस्थेच्यावतीने प्रस्ताविक डॉ. तांबोळी व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर यांनी केले.

या नंतर संमेलनाध्यक्ष डॉ. अर्जिनबी शेख म्हणाल्या,साहित्य हे समाजाचा आरसा असते, समाजात जे काही घडतं ते साहित्यात प्रतिबिंबिंत होते. ज्या साहित्यात सत्य मांडण्यात येत नाही ते साहित्य समाजाला वाचवू शकत नाही, समाजाला आरसा दाखवू शकत नाही, समाजात सकारात्मक बदल घडवू शकत नाही आणि असले साहित्य इतिहास घडवू शकत नाही.

डॉ. अर्जिनबी शेख पुढे म्हणाल्या, भारतातील मुख्य समस्या गरीबी आणि आर्थिक बळकटी करिता योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. पती आर्थिक स्वरूपात सक्षम नसल्याचे कारणाने उदभवणारी आर्थिक तंगी व महिलांची होणारी तारेवरची कसरत चिंतेची बाब आहे, महिलाच्या हाताला काम मिळाले कि आर्थिक तंगी दूर होण्यास मदत मिळते .मुस्लीम महिलाना पुरुषाकडून पदोपदी मिळालेल्या सहकार्य मुस्लीम महिलाच्या जीवनात साफल्यपूर्ण आनंदी बहर आणू शकते. मुस्लिम समाजाच्या उत्कर्षात अखंड भर घालु शकते .

सुत्रसंचलन डॉ. महंमद शेख यांनी केले तर आभार अय्यूब नल्लामंदू यांनी मानले .

दुपारचा परिसंवाद प्राचार्य शकील शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सत्रात नसीम जमादार कोल्हापुर , हसीब नदाफ , अय्युब नल्लामंदू , तहसीन सय्यद पुणे , निलोफर फणीबंद , रजिया जमादार अक्कलकोट हे सहभागी झाले .त्यांनी
” स्त्री मुस्लिम मराठी साहित्यिकांची दिशा ” या विषयावर आपले विचार प्रकट केले. सुत्र संचलन प्रा. सौ.रईसा मिर्झा यानी केले.

बहारदार कवी संमेलन

मुबारक शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात , साबीर सोलापूरी , साईनाथ राहटकर, नांदेड , मोहिदीन नदाफ , शेख जाफर अ हमीद शेख , जमील अन्सारी नागपूर ‘ शैंलेंद्र पाटील , कल्याण राऊत , शाहीदा सयद , अड इकबाल , अनिता वलांडे , सय्यद तहसीन (सर्व लातूर ) . रामचंद्र गुरव , अॅड रामचंद्र पाचुनकर ( पुणे ) सारिका देशमुख ( उस्मानाबाद ) मोहिदीन नदाफ बार्शी , राणी धनवे मंगळवेढा , सिकंदर मुजावर मोहोळ , इम्तियाज तांबोळी फलटण , जाकीर तांबोळी , सफुरा तांबोळी (वैराग ) एम. ए. रहीम (चंद्रपुर ) राहुल राजारामपुरे ( इचलकरंजी ) सुमीत हजारे (ठाणे) गौस पाक शेख (पालघर ठाणे ) प्रकाश सनपुरकर , डॉ . रेशमा पाटील , आनंद घोडके ‘ सोलापुर , गौसपाक मुलाणी , सुर्वणा तेली (सांगोला ) , शेख जाफर चिखलीकर नांदेड , निलोफर फणीबंद , सौ. रजिया जमादार ( अक्कलकोट ) सौ. महमूदा शेख देहू , अहमद पिरनसाहाब शेख ( वसमत ) ,भुपेंद्र आल्हाट ( तळेगांव दाभोडे ) या कवींनी आपल्य रचना सादर करून वाह – वाह मिळविली. याचे सुत्र संचलन अँड उमाकांत आदमाने (पुणे) व कवयित्री नसीमा जमादार यांनी उत्तम रित्या केले.

ॲड. हाशम पटेल, लातूर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप झाला. यात मुस्लीम कबीर लातूर, कवी शफी बोल्डेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. सुत्रसंचलन खाजाभाई बागवान यांनी केले तर आभार इंतेखाब फराश मानले.

एक दिवसीय फातीमाबी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मजहर अल्लोळी, अनिसा सिकंदर शेख, डाॅ. महंमद शेख, इकबाल बागबान, अबुबकर नल्लामंदू, फारूक कोतकूंडे यांनी खूप परिश्रम घेतले

यावेळी बीडचे काझी मखदुम, औरंगाबादचे डॉ. सिराज खान आरजु, पठाण ए पठाण, अय्युब खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेख पाशाभाई, माजी नगरसेवक बबलू गायकवाड, शिवसेनेचे शरद कोळी, मोहसीन मैंदर्गीकर, इंजिनियर जहागीरदार, डॉ. शफी चोबदार, अब्दुल मन्नान शेख, अन्वर कमिशनर, प्रा. बी एच करजगीकर, शगुफ्ता दंडोती, सय्यद इकबाल, अबरार नल्लामंदू आदी उपस्थित होते.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. क्रांतीतारका फातिमाबी शेख यांच्या नावाने साहित्य संमेलन संपन्न होत आहे ही अत्यंत सुखावून जाणारी घटना आहे यात सर्व सहभागी साहित्यकर्मी ,आयोजक यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments