Thursday, December 5, 2024
Homeलेखबळीराजा; सुखी करू या !

बळीराजा; सुखी करू या !

आजच्या बलिप्रतिपदा, पाडवा व व्यापारी नवीन वर्षाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा.

सुजाण वाचकहो, वर म्हटल्याप्रमाणे काय आहे ही बली प्रतिपदा ? पृथ्वीवर राजा बळी हा अत्यंत दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. इतका कि ‘इंद्राचे’ इंद्रपद धोक्यात आले. सर्व भगवान विष्णूकडे धावले व त्यानुसार भगवान विष्णू ‘वामन’ बटू चे रूप घेवुन बळी राजा (बळीराजा शेतकऱ्यास म्हणतात) त्यांचा हा बळीराजा त्याचे समक्ष उभे राहून बटू याचना करताना म्हणाला, मला तीन पावले जमीन दे.
बळीराजा आतून ओळखतो, की हे साक्षात भगवान आहेत व पुढील अनर्थ ओळखतो. परंतु याचकाची मागणी पूर्ण केली पाहिजे. बळीराजा सांगतात दिली. बटू वेषातील भगवान मंदस्मित करीत एक पाऊल टाकतात. पूर्ण धरती व्यापते, दुसरे पाऊल स्वर्ग व्यापते, तिसरे पाऊल ? बळीराजा आपले शिर (मस्तक) पुढे करतात व बळीराजाचे मस्तकावर पाय ठेवतात व बळीराजा पाताळात जातात.

वाचकहो, कधी विचार केला या बळीराजाचा ? आपण भाजी घेताना चार, दोन रूपयांची शेतकऱ्यांकडे घासाघीस करतो. मॉलमध्ये मात्र हजारो रूपये सहज उडवतो. फक्त पाॅपकाॅर्न 150/- रू देऊन हसत हसत घेतो.

शेतकरी, बळीराजा शेतात आज सण सोडून घाम गाळत आहे. त्याची दिवाळी महिन्यानंतर (देव दिवाळी).
आज आपण पाश्चात्यांचे अनुकरण करत आहोत. बाबू बनून गलेल्लठ पगार कमवत आहोत. सोन्या, चांदीच्या, सुकामेवा व मिठाईची, दारूच्या बाटल्यांची लयलूट करत आहोत. भगिनी पार्लर, स्पा मध्ये जावुन स्वतःचें सौंदर्य खुलवत आहेत. पण बळीराजाची मुले भांबावली आहेत. उन्हातान्हात रापलेले व्यक्तीमत्व की, नोकरदार लोकांसारखे सूटबूट वातानुकूलित कार्यालय व बरेच काही.

आता सद्यस्थितीत शेतकऱ्याची पिके उदा. सोयाबीन सरकारने हमीभाव काढला (सोयाबीन ची अशी स्थिती आहे की, काढणी होते तेंव्हा त्यात ओलसरपणा असतो म्हणून गावोगावी असलेले व्यापारी त्याला चांगला भाव देत नाहीत व नंतर सुकवून चांगला भाव पदरात पाडून घेतात. शेतकऱ्यास पर्याय नाही कारण कर्ज काढले आहे, घरची पोरंबाळ दिवाळीच्या आशेवर नवा कपडालत्ता, आवडत्या वस्तूच्या आशेने ओशाळभूतपणे शेतकरी पालकांकडे पहात आहेत.) सोयाबीन इतर काढणीची पिके कृषी उत्पन्न बाजार समितीत थोडा अधिक भाव मिळेल पण छोटा शेतकरी तिथवर पोहचणार कसा ? (मागे एका आदरणीय महामहिम नेते साहेब यांनी (कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमात) सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रस्थापितांनी हाणून पाडला.)

शेतकरी कायद्याचे दिल्लीत काय घडले सर्वश्रुत आहे. आता कमोडिटी बाजारच्या अनुषंगाने गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे व विद्यमान केंद्र सरकार तो करेल या बाबतीत आशा व्यक्त करते.

सुनिता नाशिककर

— लेखन : सुनिता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय समर्पक लेखन,, आज खरंच बळीराजाची म्हणजेच शेतकरी राजाची दयनीय अवस्था झाली आहे. ज्याला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधिले जाते तोच आज स्वतःचे पोट भरण्यासाठी झगडत आहे. आज बलिप्रतिपदा या निमित्ताने त्याला सुखाचे दिवस येऊ देत अशी प्रार्थना करू या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !