Wednesday, October 9, 2024
Homeलेखबहुगुणी पेरू

बहुगुणी पेरू

पेरू एक आंबट-गोड फळ असून ते आतून पांढरे अथवा लालसर असते. अनेकांना पेरू खायला आवडतो. पेरूची चव आणि आरोग्यदायी फायदे सर्वसामान्यपणे सर्वांना माहीत आहेत. पण खूप कमी लोकांना याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत. पेरूच्या पानांमध्ये भरपूर औषधी घटक असतात, जे तुमचे आरोग्य उत्तम राखण्याचे काम करतात. पेरूसोबतच त्याच्या पानाचे देखील आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.
तज्ज्ञांच्या मते, पेरूच्या फळाबरोबरच त्याच्या बिया, साल आणि पाने हे सर्व गुणधर्मांनी भरलेले आहेत. जगभरात पेरूच्या पानांचा रस पारंपारिक औषधात वापरतात. जपानमधील लोक हर्बल टी बनवण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करतात. चला जाणून घेऊया पेरूचे आरोग्यासाठी फायदे.
– संपादक

पेरू आरोग्यासाठी एक मोलाचे रत्न आणि आयुर्वेदीय महत्त्व असलेले फळ आहे. पेरू (Guava) अत्यंत पौष्टिक फळ असून यात विविध अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात.

आयुर्वेदात पेरूला विशेष महत्त्व दिले जाते, कारण ते शरीराच्या रोग प्रतिकारशक्तीला बळकट करते, पचनक्रिया सुधारते, हृदयाचे आरोग्य सुदृढ ठेवते आणि शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करते.

१. पौष्टिक गुणधर्म :

अँटिऑक्सिडंट्स : पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट्स विपुल प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्सना (Free Radicals) कमी करण्यास मदत होते.

फायबर : पेरूमध्ये भरपूर फायबर असल्याने पचन सुधारते आणि आतड्यांच्या कार्यक्षमतेस मदत होते.

जीवनसत्त्वे : पेरूमध्ये विटामिन C, A आणि B6 असतात, ज्यामुळे त्वचेला ताजेपणा येतो, आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

खनिजे : पेरूमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, ज्यामुळे हाडे आणि स्नायूंना मजबुती मिळते.

प्रतिजैविक गुणधर्म : पेरूमध्ये असलेले प्रतिजैविक घटक सूक्ष्मजंतूंविरुद्ध लढण्यास मदत करतात.

आयुर्वेदीय महत्त्व आणि उपयोग : आयुर्वेदात, पेरूचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्याच्या पानांपासून फळांपर्यंत प्रत्येक भाग औषधी गुणधर्मांनी भरलेला आहे.

पचन सुधारण्यासाठी : पेरूचे फळ आणि पाने दोन्ही पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. पेरूचा रस किंवा पाने उकळून केलेले काढा घेतल्याने अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यावर आराम मिळतो.

    2. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी :

    पेरूमध्ये असलेले विटामिन C रोग प्रतिकारशक्ती वाढवते. नियमित पेरूचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, आणि श्वसनाच्या समस्या कमी होतात.

    मधुमेह नियंत्रण : पेरूच्या पानांचा काढा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी आहे. हा काढा मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त मानला जातो.

      हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी : पेरू फळातील पोटॅशियम आणि फायबर हृदयासाठी चांगले असतात. हे घटक रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.

        त्वचेसाठी उपयुक्त : पेरूचे पानांचे पेस्ट किंवा रस त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी वापरले जाते. यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारतात आणि त्वचेवरच्या सुरकुत्या टाळतात.

          ताप कमी करण्यासाठी : पेरूच्या पानांचा काढा ताप कमी करण्यासाठी आयुर्वेदात वापरला जातो. यातील प्रतिजैविक गुणधर्म शरीरातील संक्रमण कमी करण्यास मदत करतात.

            तोंडाचे आरोग्य : पेरूची पाने चावल्याने दातांचे आरोग्य सुधारते. आयुर्वेदात, दातदुखी आणि तोंडातील अल्सरवर पेरूच्या पानांचा वापर केला जातो.

              ३. शुक्राणूंची संख्या वाढते

                पेरूच्या पानांच्या मदतीने शुक्राणूंची संख्या वाढवली जाऊ शकते. प्रजनन क्षमता वाढविण्यास पेरूची पाने गुणकारी आहेत. या पानांच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचा शुक्राणूंच्या विषारीपणावर फायदेशीर प्रभाव पडतो. ज्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.

                ४. डाइरीयावर उपयोगी.

                  पेरूच्या पाने डायरीया (अतिसार) कमी करणारे गुणधर्म असतात. पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटी-हेल्मिंथिक गुणधर्म पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करतात. तसेच, हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात

                  ५. वजन कमी करते.

                    पेरूच्या पानांमध्ये अनेक बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात, जे तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट्स रोखून ठेवण्याचे काम करतात. तसेच, ते शरीरातील साखर आणि कॅलरीजचे प्रमाण कमी करतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

                    ६. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात

                      पेरूची पाने शरीरातील हायपरग्लाइसेमिया म्हणजेच साखरेचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत करतात. जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात. याशिवाय, पेरूच्या पानांमध्ये हायपोलिपिडेमिक गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते.

                      तर असा हा बहुगुणी पेरू नियमितपणे खायला विसरू नका !

                      — लेखन : विनायक बारी
                      — संपादन : देवेंद्र भुजबळ.
                      — निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

                      RELATED ARTICLES

                      LEAVE A REPLY

                      Please enter your comment!
                      Please enter your name here

                      - Advertisment -

                      Most Popular

                      - Advertisment -
                      - Advertisment -
                      - Advertisment -

                      Recent Comments