बहुधा प्रत्येक विवाहित पुरुषाला हर क्षणी येत असलेला अनुभव म्हणजे, बायको गुरू असण्याचा ! याच अनुषंगाने नवी मुंबईतील कवी श्री गज आनन म्हात्रे यांची कविता आज वाचू या….
श्री म्हात्रे यांचे आंग्रु डूंग्रू, गजानन गीता हे काव्यसंग्रह
खाडीवरची माडी, आठवणींच्या रंगीत चिमण्या या कादंबऱ्या,
कार्लावासिनी एकवीरा आई, एकवीरा आईच्या पाच लोककथा हे संकीर्ण साहित्य,
तीन नाटकांचे लेखन प्रसिद्ध असून वृत्तपत्रातून ही ते लिहीत असतात. अनेक साहित्यिक, सामाजिक संस्थांशी ते निगडित आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
– संपादक
बायको मोठी गुरू असते
ती नेहमीच बोलत असते
तुमचं काय चुकलं ते सांगते
तेव्हा ती चुक लक्षात येते
तिचं काही चुकत नसते
बायको मोठी गुरू असते
मित्र कोण चांगला सांगते
वाईट सोडायला सुचवते
तिचं बारिक लक्ष असते
बायको मोठी गुरू असते
तुम्हास काय पचते ती सांगते
तेच तुम्हास खाण्यास देते
ती मार्मिक मार्गदर्शक असते
बायको मोठी गुरू असते
तुम्ही कुठे बघता ती बघते
इकडेतिकडे बघू नका सांगते
मधेच स्वत:कडे लक्ष वेधून घेते
बायको मोठी गुरू असते
कोणते कपडे घाला ते सांगते
काय शोभते ते ही सांगते
कपाटातून कपडे काढून देते
बायको मोठी गुरू असते.
— रचना : गज आनन म्हात्रे. करावेगाव, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800