सुट्ट्या कश्यासाठी
सुट्या कशासाठी
सुट्ट्या मज्जा करण्यासाठी
नवं तंत्रज्ञान शिकण्यासाठी
कवितांची मौज्ज ऐकण्यासाठी
मित्रांची गाठभेट घेण्यासाठी
गायीच्या वासरांना पकडण्यासाठी
मनचाहे भटकण्यासाठी
आंबे मस्त चाखण्यासाठी
गप्पां खुपखूप मारण्यासाठी
पत्ता खेळात जिंकण्यासाठी
हिरवं निसर्ग चित्र बघण्यासाठी
बैलगाडी स्वतः हाकण्यासाठी
नदीतिरी खापऱ्या भिरकवण्यासाठी
जंगलातील गोड मध खाण्यासाठी
गच्चीच्या उघड्यावर झोपण्यासाठी
विहिरीच्या पाण्यात पोहण्यासाठी
पक्ष्यांशी चिवचिव बोलण्यासाठी
डोंगराची चढण शर्यत बघण्यासाठी
झाडावरच्या कैऱ्या पाडण्यासाठी
पावसात कागदी बोट सोडण्यासाठी
पंधराताली गच्ची वरून चांदण्या पकडण्यासाठी
रंगीत शेपटीची पतंग उडवण्यासाठी
— रचना : गोविंद पाटील. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800