कर्नाटक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदच्या वतीने बेंगळूरू विभाग कार्यवाह श्रीमती दिपाली वझे यांच्याहस्ते
बडोद्याच्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री श्रीमती शुभांगिनी पाटणकर यांचा त्यांच्या एकूण साहित्यिक योगदानाबद्दल पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बडोद्याच्या इतर कवी आणि लेखकांना या प्रसंगी गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले गेले.
या प्रसंगी कविकट्ट्याचे आयोजन करण्यात आले. त्यात सर्वांनी आपापल्या रचना सुंदररितीने सादर केल्या. तसेच त्यावर साधक-बाधक चर्चाही करण्यात आली.
बडोद्यात मराठी साहित्यात आपले विशेष योगदान देणारे आणि सातत्याने चालणारा हा कविकट्टा समूह चालवण्याचे श्रेय श्री प्रसाद देशपांडे यांना जाते.
बडोदा येथील सर्व माननीय कवी, लेखक अंजली मराठे, अंजली माणगावकर, वैशाली भागवत, अजित पाटणकर, रेखा तांबे, रेवती दाभोळकर, स्वाती पाठक, मानसी म्हसकर, सुगंधा गुप्ते, सुरेखा गायकवाड, अश्विनी केतकर, डॉ. सुरेखा विनोद यांच्या उपस्थितीने व सहयोगाने हा कविकट्टा कार्यक्रम पार पडला.
या वेळी श्रीमती दिपाली वझे (बंगळूरू) यांनी स्वरचित “फुलांची गझल” सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
या सोहळ्यात गुजराती गझलकार श्री दिनेश डोंगरे यांच्या गझले सोबत त्यांची विशेष उपस्थिती जाणवली.
आपला हा कविकट्टा नेहमीच रंगीत फुलांसारखा दरवळत रहावा व यातून उत्तमोत्तम कवी, लेखक निर्माण व्हावे ह्याच शुभेच्छा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदच्या वतीने श्रीमती वझे यांनी दिल्या. बृहन्महाराष्ट्रातील हा साहित्य सहयोग पुढेही चालू ठेवण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800