दीपावली सण मोठा
तिथी कार्तिक बीज
नाहीच आनंदा तोटा
पवित्र ती भाऊबीज
चंद्रकोर नभी छान
यमासाठी दीपदान
मागितसे देवापाशी
भावासाठी आयुर्मान
माहेराची येई आठवण
बहिणीची वेडी माया
डोळे त्याच्या वाटेकडे
ध्यानी स्वप्नी बंधुराया
बहिणीच्या घरी भाऊ
करी औक्षण बहिण
छान भेट देई तिजला
सुग्रास अन्न करी ग्रहण
मनी करी कामना ती
भरभराटीची त्याच्या
तोही जागे कर्तव्याला
उभा सदा पाठी तिच्या
नाते भावा बहिणीचे
अतूट धागे स्नेहाचे
पवित्र बंधन प्रीतीचे
एकमेका जपायाचे.

— रचना : डॉ.सौ.अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर बहीण भावाचे प्रेम….सर्वांनाच नाही लाभतं पण वाचून खुप् छान वाटलं !!!! अभिनंदन अनुपमा ताई !!