सौ. भारती दिलीप सावंत खारघर, नवी मुंबई यांना जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. मातृसेवा फाउंडेशन ठाणे, सनेज आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भारती सावंत यांनी “साहित्य क्षेत्रातील माझे योगदान” या उपक्रमाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत २०० वृत्तपत्रांतून, कित्येक साप्ताहिके, मासिके तसेच विविध विषयांवरची त्रैमासिके यात त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे.
त्यांची विविध विषयांवरील ६१ पुस्तके प्रकाशित आहेत. गव्हर्मेंट अनुदानाचा इटुकली पिटुकली नावाचा एक बालकवितासंग्रह आहे. पाच पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व परिसरातून अभिनंदन केले जात आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800