Tuesday, June 24, 2025
Homeसाहित्यभिडेवाडा; मुलींची पहिली शाळा

भिडेवाडा; मुलींची पहिली शाळा

साऊमाई फातिमामाई ज्योतिबांनी घराघरात शिक्षणाची ज्योत पेटवली
त्यामुळेच आज संपूर्ण स्त्री जात ही शिकली

उस्मान फातिमा ने ठेवून घेतले ज्योती साऊला आपल्या घरी
मुलींना शिकवण्याला सावित्री फातिमा हिंडले दारोदारी

१८४८ साली भिडे वाड्यात उघडली मुलींची पहिली शाळा
संपूर्ण स्त्री जातीला घातली त्यांनी शिक्षणाची माळा

आज प्रत्येक क्षेत्रात मुली झळकत आहेत खास
ज्ञानज्योतीमुळेच झालाय आज एवढा विकास

भिडे वाड्याची काय झाली ही अवस्था
ज्योती साऊने खाल्ल्या होत्या किती खस्ता

पहिल्या मुलींच्या शाळेवर झालाय खूपच अन्याय
स्मारक बनवून मिळेल थोडा तरी अता न्याय

प्रत्येक कार्यात ज्योती साऊला दिली होती फातिमाने साथ
प्रत्येक सुखदुःखात एकमकांचा हातात होता हात

शाळेत येता जाता समाज कंटकांनी केला शेणी मातीचा मारा
साऊ फातिमाने दिलाच नाही कुणाला थारा

क्षणा क्षणाला कंटकाशी त्या लढल्या
शिक्षणाविरोधी बुरसट विचारांशी त्या भिडल्या

ज्ञान गंगोत्री म्हणून मिळावा फातिमालाही मान
साऊज्योती बरोबर भिडे वाडा स्मारकात मिळावे फातिमा उस्मानलाही स्थान

ज्योतिबा साऊला फातिमा उस्मानने दिला भक्कम आधार
स्मारक बनवताना फातिमा उस्मानचा व्हावा थोडा विचार

प्रा.अनिसा शेख

— रचना : अनिसा सिकंदर शेख. दौंड जि. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. फारच छान, अनिसा दिदी.
    कविता बढ़िया लिखा हैं आपने, मुझे आपसे न मिलने का बहुत पछतावा हो रहा हैं आपा।
    न जाने कब मुलाकात होगी
    आपने खुद होकर क्यों नहीं बात की मुझसे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरुणा मुल्हेरकर on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on पत्रकारिता हे माझे पहिले प्रेम – देवेंद्र भुजबळ
सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे