आजच्या भोगीच्या सर्वांना शुभेच्छा.
– संपादक
हेमंत शिशिरचा शहारा
भोगीचा उत्सव साजरा
तीळ भाकरीचा उमाळा
स्वादिष्ट भाजी जिव्हाळा
त्याजूनी अपरिपक्वतेला
जाणूया नव्याने पूर्णत्वाला
समर्पित मने इंद्राला
समृद्ध संपन्न निसर्गाला
घेऊ स्वानंद देऊ मोद
उपभोगू परस्पर आनंद
कारवा संक्रांतीचा भोगीच्या प्रारंभाचा
ऊस बोर हरभरा अन् सुगड्याचा

— रचना : मीरा जोशी.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
👌👌👌👌 छान