Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यमगदूम सर आणि कर्पे मॅडम लिहितात….

मगदूम सर आणि कर्पे मॅडम लिहितात….

न्युज स्टोरी टुडे पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आवर्जून उपस्थित राहिलेले विचारवंत, लेखक प्रा डॉ अजित मगदूम सर यांनी दिलेली प्रतिक्रिया ही जसे त्यांचे समाजभान दाखविते तशीच ती आपल्याला गंभीर विचार करण्यास प्रवृत्त करते.तर दुसरी प्रतिक्रिया लॉयन सौ अनुराधा कर्पे यांची असून ती प्रातिनिधिक समजायला हरकत नाही.

मगदूम सर लिहितात…
देवेंद्रजी,
आज अलकाताईंच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित बहारदार अशा कार्यक्रमात आम्हा दोघांना सहभागी करुन घेतलेत त्याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजतो.

अलिकडच्या काळात आप्त- नातेवाईक यांच्या पलीकडील वर्तुळातील लोक विशेषतः अलकाताईंच्या मैत्रिणी, सहकारी, मित्रपरिवार इतक्या प्रेमाने आणि जिव्हाळ्याने कार्यक्रमात प्रत्येक जण आपली हुन्नर दाखवत रस आणि आनंद भरत होते हे एक दुर्मिळ चित्र मी पाहत होतो. जमलेल्या निमंत्रितांत हे एवढे सुंदर गायक, कलाकार ,कवी होते हे सुद्धा एक नवलच.विशेष म्हणजे त्या व्यक्त होण्यात नैसर्गिकता, सहजता होती. हे सारे आपण दोघांनी मानवी नातेसंबंधांचा एक सुगंधी गोफ विणत प्राप्त केलेली समृध्दी आहे असे मला वाटते.

प्रेक्षागारातून डौलाने नाचत जाणाऱ्या अलकाताई आणि त्यांच्या सर्व मैत्रिणी बघून मला खूप आनंद झाला.हे काही तरी रोजच्यापेक्षा निराळं, सेंद्रिय आणि शाश्वत आहे असं वाटलं.
सगळीकडे घरातले असो किंवा बाहेरचे – सगळ्या नात्यांमध्ये एक विशविशीतपणा दिसत असतांना आपण जमवलेली मानवी संपत्ती ही खरंच स्पृहणीय आहे.
अलकाताईंना या निमित्ताने आम्हा दोघांकडून कोटी कोटी शुभेच्छा!
तुमचंही मन:पूत कौतुक आणि अभिनंदन !.

  • प्रा डॉ अजित मगदूम, नवी मुंबई.

लॉयन अनुराधा कर्पे म्हणतात,
Hi
Dear
Yesterday’s program was Awesome 🤩
We enjoy a lot
समाजातील सर्व स्तरातील तुझे मित्रपरीवार पाहुन मन आनंदीत आणि अचंबित झाले .
असेच सर्वजण तुझ्यासोबत सदैव राहो आणि तुही नेहमीच आनंदी / खुश राहो ही ईशचरणी प्रार्थना 🙏
पुनःश्च एकदा वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा🎉💐💃🙌

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments