लोकसभेच्या निवडणुकीसाठी सध्या टप्पेनिहाय मतदान सुरू आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत.
असाच एक कल्पक उपक्रम नगर जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेण्यात आला आहे. सर्व नागरिक या कल्पनेचे स्वागत करीत आहेत. हा उपक्रम म्हणजे आपण लग्न पत्रिका जशी आजकाल डिजिटल फॉर्म मध्ये करायला लागलो आहोत, त्याच धर्तीवर ही मतदानाची निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे.
नगर जिल्हा प्रशासनातर्फे श्री श्रेयस झरकर या युवकास मतदारदुत – २२१ नेवासा विधानसभा मतदारसंघ म्हणून नेमण्यात आले आहे. त्यानेच ही अनोखी आमंत्रण पत्रिका तयार केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही अनोखी निमंत्रण पत्रिका पुढील प्रमाणे आहे.
|| अनोखे सस्नेह निमंत्रण ||
लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी होण्यासाठी उद्या १३ मे २०२४ रोजी नगर आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तरी आपण आपल्या मताधिकारचा वापर करून लोकशाही च्या महाउत्सवात नक्की सहभागी व्हा..
निमंत्रक
श्री.सिध्दराम सालीमठ
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, अ.नगर
श्री. राहुल पाटील
उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, अ.नगर
मीना शिवगुंडे,
जिल्हा स्वीप नोडल अधिकारी, अ.नगर
श्री.बाळासाहेब कोळेकर
निवडणुक निर्णय अधिकारी ३८, शिर्डी लोकसभा मतदारसंघ
श्री.अरुण उंडे
सहा.निवडणुक निर्णय अधिकारी ३८ शिर्डी लोकसभा मतदारसंघ
डॉ.संजय बिरादार
अति.सहा.निवडणुक निर्णय अधिकारी, २२१ नेवासा विधानसभा मतदार संघ
श्री.किशोर सानप
नायब तहसीलदार, नेवासा
श्रेयस झरकर,
मतदारदुत -२२१ नेवासा विधानसभा मतदारसंघ.
डिजिटल निमंत्रण पत्रिका पुढील प्रमाणे आहे.
https://www.facebook.com/share/v/NQLkUmP1JpS86rc6/?mibextid=w8EBqM
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800