चांगलं काहीही आपोआप घडत नाही,
सगळ्यांनी समजून हे, घ्यायला हवं,
आपले संरक्षण, आपल्या उन्नतीसाठी,
मतदानाचं पवित्र कार्य, करायला हवं,
प्रश्न नेमके समजून घेतो, सोडवाया देई गती,
संपर्क सतत ठेवतो, दिसून येते नीत्य प्रगती,
तरूणांचा आदर्श जो, दुबळ्यांना धीर देतो,
मत देवून आपुले, कर्तव्य चोख करायला हवं,
निवडावा असा नेता, राष्ट्रप्रेमी आहे जो,
खरोखर लोकांचे काम, मनापासून करेल जो,
त्याला असेल जाण, मातीशी खरी आण,
संस्कारी, सशक्त नेत्यांना, निवडायला हवं…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
–,संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800