विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी प्रभावी जनजागृती केल्याबद्दल समजमित्र श्री मदन लाठी यांचा तसेच आणि इतर निवडणूक आयकॉन नुकताच यांचा जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
श्री आयुष प्रसाद यांनी नुकताच प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
श्री मदन राठी यांनी १००% मतदान करण्याचा निर्धार आणि तसा ठराव केलेल्या वादनगरी ग्रामपंचायत परिसरात काम केले. ही ग्राम पंचायत राज्यात दुसरी आहे. आवर आणि खेडी खुर्द गावातही मतदान जनजागृती केली. त्याबरोबर रोज विविध ठिकाणी मतदानाचे महत्व सांगून मतदारांना शपथ दिली.
त्यात प्रामुख्याने जैन इरिगेशन सिस्टिम लि, जैन फार्म फ्रेश लि मधील विविध,ओरिएंट सिमेंट, नशिराबाद, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, मणियार कॉलेज, आय एम आर कॉलेज, केसीई इंजिनीरिंग & मॅनॅजमेण्ट कॉलेज, औद्योगिक वसाहतीतील लीग्रँड, सुप्रीम इंडस्ट्रीज, गाडेगाव, माहेश्वरी समाज शहर & तहसील, प्रजापिता ब्रह्माकुमारी सेन्टर, जळगाव, भुसावळ रेल्वे स्टेशन, डॉ .आंबेडकर उद्यानातील हास्य परिवार, हरी ओम ग्रुप रिंग रोड, बहिणाबाई उद्यानातील योग ग्रुप, भाऊंचे उद्यानातील योग ग्रुप, वरिष्ठ नागरिक चैतन्य ग्रुप, माहेश्वरी वरिष्ठ नागरिक, रोटरी मिडटाऊन, जिल्हा न्यायालयातील वकील चेंबर असोसिएशन, जामनेर तालुक्यातील महिला बचत गट, नेरी येथील मोहिनी हॉटेल, सकाळ राजस्थानी समाज, पिंप्राळा रोड वरील भाजी विक्रेता, पेट्रोल पंप, बजरंग बोगद्याजवळील गणेश डेअरी, ज्युस सेन्टर, प्रेसिडेंट हॉटेल मध्ये सप्तरंग न्युज चॅनेल मध्ये मराठी सिने अभिनेता विजय पाटकर यांचे सोबत, ठिकठिकाणी जनजागृती सोबत अशा विविध प्रकारे मतदान जनजागृती केलेली आहे.
श्री मदन राठी हे वेळोवेळी समाजाची, प्रशासनाची गरज ओळखून स्वतः निरपेक्ष भावनेने पुढे होऊन आवश्यक ती कामे करीत असतात. तसेच त्यांनी आतापर्यंत विविध निमित्ताने ८९ वेळा मतदान केले आहे.
श्री लाठी हे न्यूज स्टोरी टुडे पोर्टलशी सुरुवातीपासून जोडल्या गेले आहेत. त्यांचे आपल्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800