Saturday, July 27, 2024
Homeबातम्यामदन लाठी : ८६ वे रक्तदान

मदन लाठी : ८६ वे रक्तदान

“रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान”. माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून देवाचे लाडके व्हावे हे ब्रीदवाक्य जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि तापीकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन रामनाथ लाठी यांचे आहे.

कालचा दिवस म्हणजे १२ डिसेंबर हा सर्वांचे प्रेरणा स्थान असलेले, जैन उद्योग समुहाचे संस्थापक आदरणीय मोठे भाऊ (कै भवरलाल जैन) यांचा ८६ वा वाढदिवस आणि जैन इर्रीगेशन चे हितचिंतक मदन लाठी यांचे कालचे ८६ वे रक्तदान हा एक छान योगायोगच म्हणावा लागेल.

मदन लाठी यांनी आतापर्यंत विविध प्रसंगी रक्तदान करून रक्तदान या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांनी पहिल्या करोना काळात नोव्हेंबर २० & १२ डिसेंबर २०२० रोजी प्लाझ्मा दिल्याने सोलापूरचे घाडगे याना & इतर तीन रुग्णास जीवनदान मिळाले. त्यावेळी मदन लाठी याना विविध संस्थांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र दिले होते & सत्कार केला होता.

२५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठे भाऊंचे स्मृतिदिनानिमित्त सुद्धा त्यांनी रक्तदान केले होते.१ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविन्द सरांचा ७६ वा वाढदिवस & मदन लाठी यांनी ७६ वे रक्तदान पुण्यात पिंपरी चिंचवड येथील शासकीय वाय सि एम मध्ये केले होते. त्यावेळी राष्ट्रपती यांचे निजी सचिव यांनी मदन लाठी यांचे उपक्रमाबद्दल अभिनंदन केले होते.

अशा विविध प्रसंगीं मदन लाठी रक्तदान करीत असून वयाच्या ६५ वर्षापर्यंत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदान करणार आहेत.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८