जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी, लोकसभेच्या आणि विधानसभा निवडणुकीचे जळगाव जिल्हा ऑयकाॅन, न्यूज स्टोरी टुडे परिवाराचे सुरुवातीपासूनचे सदस्य, सदिच्छादूत श्री मदन लाठी यांनी आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपले ९१ वे रक्तदान यशस्वी पणे केले. हे रक्त दान त्यांनी केशवस्म़ॄती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोंडवलकर स्वयंसेवी रक्तकेंद़ येथे केले. या आधीचे ९० वे रक्तदान त्यांनी ६ जानेवारी रोजी केले होते.
रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून देवाचे लाडके व्हावे हे मदन लाठी यांचे ब्रीद आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रक्तदान करीत असतात.

आतापर्यंत त्यांनी विविध प्रसंगी रक्तदान करून एक रक्तदान या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांनी पहिल्या करोना काळात नोव्हेंबर २० & १२ डिसेंबर २०२० रोजी प्लाझ्मा दान केल्यामुळे सोलापूरचे घाडगे याना आणि इतर तीन रुग्णास त्या काळात जीवनदान मिळाले. त्यावेळी मदन लाठी याना विविध संस्थांनी कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800