Saturday, July 27, 2024

मन

मन वढाय वढाय धावे, पळे
स्वप्नाच्या नगरीत विसावे
वाटे नको शाळा, काॅलेज
स्वच्छंद गाणे गावे ||१||

भटकावे मुक्त जंगलात
टेकड्या वरूनी बघावे सारे
निसर्गाच्या संगतीत आनंदावे
फुलांचे सुंगधी वारे ||२||

खळखळती नदी नाले
इंद्रधनुचे सप्त रंग बघावे
नदीकाठी ऐकावी बासरी
पाण्यावर तरंगावे ||३||

फुलपाखरांचे उडती थवे
फुललेली फुले आनंदाने डोलती
फुलांच्या करूनी माळा सजावे
वार्‍याने दाराची तोरणे हालती ||४||

आकाशात पंख पसरूनी उडावे
चंद्र, चांदण्या घेऊनी हाती
सजवावे केसावरती
जीवनाची होते माती ||५||

डॉ अंजली सामंत

— रचना : अंजली सामंत
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments