मराठी तरुणांनी केवळ नोकऱ्यांच्या मागे न धावता उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन अमेरिका स्थित गर्जे मराठी संस्थेचे संचालक श्री आनंद गाणू यांनी नुकतेच केले. ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथील स्टुडिओत घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
- गर्जेमराठी ह्या अमेरिकेत सुरू झालेल्या संस्थेच्या जगभरात २७ शाखा आहेत. विविध स्तरावर काम करून जगभरातील मराठी लोकांना जोडण्याचे आणि विशेषत: महाराष्ट्रातील तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी ही संस्था काम करते. पद्मविभुषण डॅा रघुनाथ माशेलकर, पद्मश्री प्रतापराव पवार, केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी आणि अनेक उच्च पदस्थ मराठी मंडळींचा आशिर्वाद आणि पाठिंबा ह्या संस्थेला मिळतोय आणि वृद्धिंगत होतोय.
आनंद सरांबरोबर मेलबर्नच्या स्टुडीओत गर्जे मराठीबद्दलच नाही तर त्यांच्या व्यक्तिगत जीवना बद्दलही जाणुन घ्यायचा प्रयत्न केला गेला. दक्षिण आफ्रीका ते मुंबई रोड ट्रीप, स्वतःची व्यावसायिक वाटचाल अशा अनेक विषयांवर त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
श्री समीर बोरकर यांनी घेतलेली ही दिलखुलास मुलाखत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
— लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +91 9869484800
छान विचारमंथन .