Thursday, January 16, 2025
Homeलेखमला भावलेले सुरेश शुक्ल

मला भावलेले सुरेश शुक्ल

अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार, श्री. सुरेश शुक्ल ह्यांना “जीवन गौरव” पुरस्कार मिळाल्याचे वृत्त कानावर पडताच मला खूप आनंद झाला आणि त्यांच्याविषयी थोडक्यात लिहावे असे मनात आले. म्हणून हा लेखन प्रपंच.

आयुष्यातल्या अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन हा वाळवंटातील मृगगजळाप्रमाणे एक भ्रम आहे. त्यामुळे, अडचणींच्या ओझ्याखाली ‘मन’मारुन जगण्यापेक्षा अडचणी पेलून त्यावर मात करण्याचा ‘मना’पासून प्रयत्न करायला हवा. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशाचे गमक मन हेच आहे. मनापासून केलेलं कोणतेही कार्य सिद्धीस जाते. सुरेश शुक्ल असे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी लहानपणापासून अनेक अडचणींना मात देत देत आपला जीवन प्रवास अगदी यशस्वी रित्या पार पडला. संकट कोणाच्या वाटेला येत नाही. सगळ्यांच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात संकट येतात. पण जो ह्या संकटावर मात करतो तो यशस्वी होतो.

कधी कधी केलेला संघर्ष आपल्या आठवणीत कायम स्वरूपात राहतो. कसं असतं ना, काही सुखद, उबदार, तर काही दुःखाची किनार लाभलेल्या आयुष्याच्या उतरणीवर साफल्याच्या समाधानाने भरलेले  तृप्त मन आपण बघत असतो. संसाराच्या रहाटगाडग्यात स्वतःच्या आवडीनिवडी शुक्लजींनी कधी जोपासल्या नाहीत. त्यामुळेच,  इच्छा-आकांक्षा बाजूला सारून ते संघर्ष करत होते. व्यग्र जीवनशैली, दैनंदिन व्याप, अडीअडचणी ह्यावर मात करत ते पुढे चालत राहिले. कदाचित तुम्हाला माहिती असावं, आपल्या अंतर्मनात एक अद्भुत शक्ती वास करते. ती म्हणजे आपला स्वतःचा आत्मविश्वास.  ‘मी हे काम करेल किंवा मला हे जमेलच’ हा जो मनातून येणारा आवाज असतो तो असतो आपल्या अंतर्मनातला आत्मविश्वास. हाच आत्मविश्वास धरून ते प्रत्येक संकटाला तोंड देत आले.

एक सांगते, रोजच्या जीवनातले उदाहरण पहा, आपण घरात एखादी सकारात्मक भूमिका किंवा मनात सकारात्मक आव्हान बोलतो तेव्हा नकळतपणे घरातली वास्तू ही तथास्तु म्हणते आणि ते काम सहजरीत्या होतं. तसच नकारात्मक जेव्हा बोलतो तेव्हा वाईट गोष्टी घडू लागतात. म्हणूनच आपण नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. ‘मी हे काम खूप चांगल्या प्रकारे करु शकते’ या विश्वासामुळेच आपण केलेले प्रयत्न सफल होतात. आपल्या प्रयत्नांना यशाचे रुप मिळते ते केवळ आपल्या आत्मविश्वासामुळेच. हेच ह्यांच्या बाबतीत घडले.
              
माणसाला देवाने एक मोठे सामर्थ्य दिले आहे ते म्हणजे विचार. ही खूप मोठी माणसाची शक्ती आहे आणि ह्या शक्तीला पाठबळ मिळालं ते माणसाच्या भक्तीने. भक्ती हे माणसाच्या श्रद्धेचे रूप आहे आणि या भक्तीत जेव्हा संशय नावाचे विष जन्म घेतं तेव्हा ही शक्ती पूर्णतः नष्ट होते, म्हणजेच जेव्हा आपण स्वतःवर संशय घेऊन एखादे काम हाती घेतो की मी हे काम करू शकेन की नाही तेव्हा मात्र त्यातली ऊर्जा त्यातली शक्तीही कमी व्हायला सुरुवात होते आणि परिणाम मिळतो तो नकारात्मक. आपण आपल्या स्वतःवरच जेव्हा संशय घेतो तेव्हाच नकळतपणे दुसऱ्यांवर संशय घेण्याची प्रवृत्ती ही त्या माणसात जन्म घेते आणि या संशयरुपी विचारांच्या स्पंदनांना नशिबाकडूनच तथास्तु प्राप्त होते.

शुक्लजीनी खूप चांगली, थोर माणसे आपल्या स्वभावामुळे जोडली आहेत. ह्यात त्यांना साथ दिली ती त्यांच्या धर्मपत्नीने. आपल्या सुखी संसारात सुद्धा समजूतदारपणा महत्त्वाचा आहे,  तडजोड महत्त्वाची आहे, तितकाच महत्त्वाचा आहे एकमेकांवरचा विश्वास. या विश्वासानेच नाते टिकवता येते. हेच नातं ह्या दोघांनी एकमेकाला जोडून ठेवलं.
            
आपल्या आत्मविश्वासामुळे व समोरच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे नाते आयुष्यभर टिकून राहते. हा आत्मविश्वास जर टिकून राहायचा असेल तर आपण जी भक्ती, ध्यान करतो त्यानेच हा आत्मविश्वास वाढावयास आपसूकच मदत होते. हीच सोबत राहण्याची साथ ह्यांनी आयुष्यभर एकमेकांना दिली आणि आताही ते देतच आहे.

आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आपल्या आयुष्यात कधीही, कुठेही त्यांनी हिम्मत खचू दिली नाही अथवा ती, ढासळली नाही. कधीही मागे वळून पाहिले नाही, आपल्या चिकाटीने, जिद्दीने, मेहनतीने पुढे जात राहिले. यश मिळेलच. हिंदीत एक म्हण आहे, “कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती” हेच मनी ठरवलं आणि ते पुढे जात राहिले.आज त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांचे कष्ट, त्यांचा संघर्ष याचे खऱ्या अर्थाने चीज झाले. वयोमानाने आज त्यांच्याकडून काही
काम होत नाही. त्यांना पाठीचा, कमरेचा त्रास आहे. तरी ते सदा हसतमुख असतात. त्यांना माझा मानाचा त्रिवार सलाम.

— लेखन : पल्लवी उधोजी. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
             

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय