नेता तो शेतकऱ्याचा
दिनदुबळ्यांचा कैवारी
शिकविले सावित्रीला
ज्ञानगंगा आणली दारी
कष्टुन ज्योतिबा साऊने
खुले केले ज्ञानाचे दार
बनले शिक्षणाचे दीपस्तंभ
दिला साक्षरतेचा अधिकार
स्थापिला शिक्षणासाठी
‘सत्य शोधक समाज’
सर्वत्र दिसत आहेत
मुली शिकताना आज
बंद केला अत्याचार
झाले विषमतेवर आरूढ
ग्रंथ लिहिला त्यावर
‘शेतकऱ्यांचा आसूड’
धन्य ते ज्योतिबा सावित्री
जन हिता जीवन वाहिले
हौद पाण्याचे पिण्यासाठी
अस्पृश्यांना केले खुले
संपवली विदारकता
मांडला मानवता धर्म
शेवटपर्यंत झटले
असे ज्योतिबाचे कर्म

— रचना : अनिसा सिकंदर शेख. दौंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800