Tuesday, July 23, 2024
Homeबातम्यामहानुभाव पंथ समाज चिंतन चर्चासत्र संपन्न

महानुभाव पंथ समाज चिंतन चर्चासत्र संपन्न

महानुभाव सोशल वेलफेअर फाउंडेशन, नागपूर तर्फे आयोजित महानुभाव समाज कल्याणार्थ चर्चासत्र नुकतेच आदर्श विद्या मंदिर, शारदा चौक, अयोध्या नगर नागपूर येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एन आर शेंडे होते. प्रास्ताविक फाउंडेशनच्या सचिव श्रीमती सोनल चौरे यानी केले. फाउंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती भारतीताई शेंडे यानी सामाजिक क्षेत्रात सेवा देण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य होय असे म्हटले.

गिरीशजी चौरे व श्रीमान साजनजी शेंडे यांनी फाउंडेशनची धेय्य, धोरणे, कार्यविस्तार यावर प्रकाश टाकला.

चर्चासत्रात श्रीमान जवदंड गुरूजी, श्रीमान अशोकजी खांडेकर, श्रीमान श्याम निमगडे, श्रीमान राष्ट्रपाल मेश्राम, श्रीमान छत्रपती शेंडे, श्रीमती मंदाताई कोवले, सौ. रोमाताई बन्सोड, श्रीमान आनंद पाटील, श्रीमान भिमराव उके, श्रीमान प्रभाकर बोरकर, श्रीमान ताम्रध्वज खोब्रागडे, ईत्यादीनी भाग घेतला.

या चर्चासत्रात खालील विषय हाताळण्यात आलेत.
1) धार्मिक क्षेत्रात भरपूर संस्था कार्यरत आहेत. परंतु सामाजिक क्षेत्रात एकही नाही, ते उपेक्षितच आहे. 2) महानुभाव समाजातील मुलाना शिक्षण घ्यायला शहरात वसतिगृह नाहीत.
3) महानुभाव समाजाचे एकही हॉस्पिटल, व्यवसाय मार्गदर्शन केन्द्र, कालेज वा सभागृह नाही.
4) महानुभाव समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय दृष्टीकोनातून दुर्लक्षित व उपेक्षित आहे. यातून समाजाची सर्वागिण प्रगती करण्यासाठी योजना राबविण्यात यावी.

प्रमुख वक्ते श्री श्याम निमगडे यानी महानुभाव पंथात अनेक गट आहेत ते धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात काम करतात, पंरतू सामाजिक जनहिताच्या दृष्टीकोनातून उदासीन असतात. ईतर समाजातील संस्था मात्र आपआपले सामाजिक हित व्यवस्थित जोपासतात.

श्री अशोक खांडेकर यांनी चर्चासत्रातून अध्यात्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक कार्यात लोकानी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

श्री एन आर शेंडे अध्यक्षीय संबोधनातून म्हणाले की, हे कार्य खूप आधीपासून सूरू व्हायला पाहिजे होते, पण अजूनही वेळ गेली नाही. सर्व मंडळ व ग्रुपनी यात सहभाग घ्यावा.

श्री जवदंड गुरूजीनी फाउंडेशन च्या सुरू होऊ घातलेल्या एम पी एस सी कोचिंग क्लासेस साठी आपल्या शाळेत जागा देण्याचे जाहीर केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यात श्री राहुल व सौ. प्रिया शेंडे, श्री गौरव वासनिक, श्री तेजेन्द्र गजभिये, सौ.यशोदाताई निमगडे, श्री भूपेश शेंडे यांचे मोलाचे योगदान लाभले.

संचालन श्री घनश्याम बन्सोड यानी तर आभार प्रदर्शन श्रीमती स्नेहल गजभिये यानी केले. अल्पोपहारानंतर कार्यक्रम संपला.

— टीम एनएसटी. ☎️ 9849484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः