Saturday, April 13, 2024
Homeसाहित्यमाझा जीवन उत्कर्ष…. !

माझा जीवन उत्कर्ष…. !

आई असते दैवत
सर्व काही जोडणारी ।
बाबा तसेच साथीला
वृत्ती त्यागी बांधणारी ।।१।।

देह माता घडविते
बाबा खाण विचारांची ।
आई संस्कार करते
बाबा धुरा संसाराची ।।२।।

मुखी घास भरविते
चिऊ काऊ गोष्टीतला ।
देह राबतो बाबांचा
देव तोच मनातला ।।३।।

प्रेम आईचे अपार
गोड कष्टाची भाकरी ।
पायी चाले अनवाणी
बाबा करण्या चाकरी ।।४।।

पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य
मोल ज्याचे आजवर ।
माझे दैव माय तात
त्यांच्या पायी विश्वेश्वर ।।५।।

माझा जीवन उत्कर्ष
सुख आहुतीने ज्यांच्या ।
अश्रूपाते प्रक्षाळीता
प्रार्थीतसे पायी त्यांच्या ।।६।।

अरुण पुराणिक

— रचना : अरुण पुराणिक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments