कळीत मिटलेलं फूल,
गर्भात जपते मूल,
अनुभवण्यास भाग्य लाभले ‘आईस’ ॥
पाण्यात दिसते प्रतिबिंब,
आरसा दाखवतो रुबाब,
मोठे वाटत नाही ‘आईस’ ॥
आयुष्य आईच्या कर्जात,
जन्म आईच्या ऋणात,
व्याज लावत नसते ‘आई’ ॥
घरे तुटून बिखरतात,
आठवणी हृदयी राहतात,
जीवनी पान असते ‘आई’ ॥
व्यापता न येणारे अस्तित्व,
मापता न येणारे मातृत्व,
उदंड प्रेम देते ‘आई’ ॥
अपेक्षा विना वाढवते,
मुलांच्या सुखात सुखावते,
अखंडीत श्वास म्हणजे ‘आई’ ॥
तुझ्या विना जगले आई,
रोगांवर उपाय दवाई,
जगी एकच औषध ‘आई’ ॥
आईला शुभेच्छा काय देणार !
तिच्याच शुभेच्छांवर घडणार,
घडवली मूर्ती देवरुपी ‘आई’ ॥

— रचना : सौ. वर्षा भाबल. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
👌👌👌👌आई वर छान रचना केली