Wednesday, June 19, 2024
Homeसाहित्यमाझी आजी

माझी आजी

कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या सानिकाच्या आजीचे नुकतेच निधन झाले. पण आजीचा दुरावा ही नात अजून हि सहन करू शकत नाही. त्यातूनच तिला ही कविता सुचली…
छोट्या सानिका ची ही पहिलीवहीली कविता आपल्या पोर्टलवर. सानिकाचे न्युज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

सोबत नसलीस तू जरी
राहतिल तुझ्या आठवणी
आधार देतील आम्हाला
त्या तुझ्या सहवासाची,

नव्हते कळले आधी की
तू अशी अचानक जाशील
तुझ्या जवळ बसून तर
अजुन खुप काही बोलायचे होते

आताही आठवते मला जेव्हा तू
तुझ्या जीवनाचे धडे सांगायची
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
तू आम्हाला सावध करायची

कुठे बाहेर जातांना तुझे ते मऊ हात
आमच्या गालावर फिरवत असायची.
तेव्हा नव्हतं वाटायचं खरंच एवढ काही,
पण आज त्याच सहवासाची गरज भासतेय

शेवटी स्वतःच्याच मनाला समजवावे लागेल
आयुष्याच्या या कटुसत्यासह पुढे जावेच लागेल
तुझ्या त्या मूळ व्याख्यांना आता
विश्वाचे एक भाग बनवावे लागेल

माहित आहे मला तू
बघत आहेस देवाघरून
म्हणून तुला अभिमान वाटेल
असेच कार्य करायचे आहे

आजी खरचं गेलीस तू पण
तुझा तो स्पर्श कायमच राहिल.
तुझ्या जाण्याचं दुःख आहेच,
पण आता तुझे अपूर्ण राहिलेले
स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द आहे

आजी, जिथे पण आहेस तू
नेहमी आम्हाला बघत रहा
आणि सदैव हसत रहा
सदैव आशीर्वाद देत रहा

सानिका रोडे

— रचना : सानिका प्रनील रोडे. अकोला
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. मनाला लागणारी अतिशय सुंदर अशी कविता लिहिली आहे, अक्षर्षा डोळ्यात पाणी आल वाचून. आजी सारखं प्रेमळ कोणी नसत, तिची माया वेगळीच असते. अतिशय चांगल्या पद्धतीने तू हे दर्शविले आहे.जीवनाच्या प्रत्येक वाढणावर कोणी असो किंव्हा नसो तुमच्या सोबत आजी नेहमी असते, आणि तुज हे आजी बद्दल च प्रेम, तू शब्दांच्या माळीत खूप उत्तम पणे रचले आहे.

  2. मनाला लागणारी अतिशय सुंदर आशी कविता लिहिली आहे, अक्षर्षा दोड्यात पाणी आल वाचून.आजी सारखं प्रेमळ कोणी नसत, तिची माया वेगडीच असते.अतिशय चांगल्या पद्धतीने तू हे दर्शविले आहे.आजी बद्दलच तुज हे प्रेम, तू शब्दांच्या माळीत खूप उत्तम पणे रचले आहे.

  3. ही कविता आपल्या आजीला एक सुंदर श्रद्धांजली आहे. हे तुमचे तिच्यावरील प्रेम आणि तुम्ही शेअर केलेल्या प्रेमळ आठवणी सुंदरपणे कॅप्चर करते. तुमच्या अंतःकरणातील तिच्या कायमस्वरूपी उपस्थितीची ती एक हृदयस्पर्शी आठवण आहे. असा मनापासून भाग शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

  4. कवित समाप्त होता होता खरंच डोळ्यात पानी आले🙏🙏

  5. खुप सुंदर रचना सानिका.आजी आचानक जायचं दुःख नेहमी राहिलच पण तिचा सहवास आपल्यासोबत आहे.आजी ला वाचनाची आवड होती तिच्यासाठी इतकी छान कविता रचून खुप सुंदरतेने श्रद्धांजली दिलीस तू तिला.

  6. आईच्या पश्र्च्यात आजीच आयुष्यात आई सारखे प्रेम करू शकतात.. आई एकदा रागावते पण आजी आईच्या रागा पासून रक्षण करते.. आई बाबांच्या नकारानंतरही आजीच असते जी लपून आपल्या ईच्छा पुर्ण करते आईनंतर आजी हीच देव असते, जिथे आईच्या प्रेमासारखे प्रेम असते.. आईच्या ममते सारखं ममत्व असते..

  7. खुप सुंदर कविता लिहिली आहे , वाचून मला माझ्या आजी साथी सुधा अस्नार्या भावना शब्दात मांडलेल्या वाटल्या.Loved it ❤

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments