पलपब या अहमदाबाद येथील मराठी साहित्य संस्थेने प्रा.मानसी मोहन जोशी यांना साहित्यिक कारकिर्दीसाठी जीवन गौरव पुरस्काराने, कराडच्या प्रिती संगमावर नुकतेच सन्मानित केले. यावेळी पलपब संस्थेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, माजी राजदूत मा. ज्ञानेश्वर मुळे, संमेलनाध्यक्ष होते, माजी पोलिस कमिशनर विनायकराव जाधव, तर प्रमुख पाहुणे राजाराम काॅलेज कोल्हापूरच्या माजी प्राचार्या रेखा दिक्षित आणि पाठ्यपुस्तकात दोन कविता असणारे कवी हनुमंत चांदगुडे होते. अशा अत्यंत सुप्रसिद्ध मान्यवरांच्या हस्ते प्रा. मानसी जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
“पलपब” ही पब्लिकेशन संस्था, अहमदाबाद गुजरातमध्ये असून संस्थापक सेजल पाटील या तैवानला असतात. लिना पाटील, सिध्दार्थ पाटील, धीरज पाटील हे कुटुंब मुळचे कराडचे असून अहमदाबाद येथे स्थायिक झालेले आहेत. मराठीचा प्रचार करुन मराठी लेखकांनी जास्तीत जास्त पुस्तकं प्रकाशित करावीत म्हणून कमीतकमी खर्चात ना नफा ना तोटा या तत्वावर पुस्तके प्रकाशित करुन प्रकाशन सोहळा आयोजित करत असतात.
मा.यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत ‘पलपब’ चा पहिला वर्धापन दिंन साजरा व्हावा या थोर हेतूने कराड प्रिती संगमावर वर्धापन दिंन उत्साहात साजरा झाला.
— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800