मान्सून साड्यांचा लागला होता सेल
मिळून जाण्याचा ठरवला होता वेळ
झकपक साड्यांवर घातले मॅचिंगचे दागिने
नाक मुरडत शेजारीण म्हणे हे तर झाले जुने
एकीला तर ताबडतोब करायचा होता मेल
साऱ्यांनी ठरवलं मग,आधी खाऊ भेळ
रस्त्यावरून चाललो होतो आम्ही साऱ्या बिनधास्त
बायकांचं वागणं म्हणजे एक पायरी जास्त
अर्ध्या रस्त्यातचं सुरू झाला ना हो पाऊस
अगं बाई एकजण म्हणाली मला भिजायची हौस
छत्री उघडून काही जणी खेटून खेटून चाललेल्या
जोरदार वारा येताच अर्ध्या छत्र्या उडलेल्या
अचानक खड्यातून गाडी गेली की जोरात
शिंतोडे उडताच बाया ओरडल्या की तोऱ्यात
साडी आवरू की छत्री सावरू झाली अशी गत
सेलच्या हौशीने बिचाऱ्या, चालत होत्या कन्हतं
हौशेला मोल नसतं बरं,बायाकडून कळतं
स्वस्तात मिळालेल्या साड्यांवरून चित्र सारं दिसतं
एकदाचं भव्यदिव्य दालन साड्यांचं आम्ही गाठलं
रंगबिरंगी पुतळ्यांनी सुंदर होतं हो…थाटलं
या हो ताई, या हो माई, या हो बाई आक्का
आपलंच दुकान समजून बांधा साड्यांचा सट्टा
बारा तेरा साड्या घेऊन हौस नव्हती ना फिटली
पिशव्या पाहून रिक्षावाल्याच्या कपाळी तिडीक उठली
घरी आल्यावर म्हणते कशी पावसाने संधी हुकली
आणखी घ्यायच्या होत्या पण्,चिखलात मैत्रीण फसली
जरा बोलला नवरा तर भांडायला ती भिडली
मी होते म्हणून आजवर तुमच्या घरात टिकली
बरं बाई!! म्हणत त्याने, घेतली शेवटी माघार
भांडणंच हो नवरा बायकतलं,”ना नगद ना उधार”
एक मात्र नक्की…..!!
या मान्सून ऑफर नवऱ्यांना खूप पडतात महागात
काही बरे बिचारे ते, “हो शी ला हो” म्हणतात
सावध व्हा पुरुषांनो, सुरू होणार मान्सून ऑफर
बायका करणार आहेत, तुमचा सुद्धा जोकर
— रचना : सौ.प्रज्ञा कुलकर्णी. वसमत
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800