मायेची माणसं
सुगंधी अत्तर
त्यांच्यामुळे होई
जीणं शुभंकर……१
मायेची माणसं
साथ अनमोल
नात्यांचे हे बंध
आहे खूप खोल……२
सापडे तयांच्या
ह्रदयात ओल
त्यांच्या विण जीणं
वाटे मज फोल…..३
संकट समयी
होती पहा ढाल
ममता, प्रेमाची
पांघरती शाल……४
त्यांच्या असण्याचा
असतो आधार
आशिष तयांचे
स्वप्नांना आकार…..४
मायेची माणसं
घरची संपत्ती
धाव घेती सर्व
येताच आपत्ती……५
शरिरी जखम
हळूच फुंकर
अश्रू नेत्री येता
मायेचा पदर…..६
नसते कधीच
कोणाची अपेक्षा
प्रेम, स्नेह देती
ना व्हावी उपेक्षा…..७
साह्य करण्यास
हातामध्ये हात
सतत तेवावी
नात्यांची ही वात……८
मायेची माणसं
ना द्यावे अंतर
जपावे नात्यांना
नित्य निरंतर……९
— रचना : डॉ दक्षा पंडित. अमेरिका, ह.मु.मुंबई
सुंदर