Saturday, April 13, 2024
Homeबातम्या"मालगुंड" प्रकाशित

“मालगुंड” प्रकाशित

आपल्या देशात दिवाळी सणाच्या निमित्ताने आकाश कंदील, फटाके, नवीन खरेदी इत्यादींचे वेध लागतात.

महाराष्ट्रात तर वाचकप्रेमी रसिकांसाठी दिवाळी अंक असेही एक समीकरण आहे. या निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शहर शाखा आयोजित ‘मालगुंड २०२३‘ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेचे मुख्यालय नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे येथे लेखक कवी रसिकांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ठामपा अतिरिक्त आयुक्त, संदीप माळवी, तन्वी हर्बलच्या, डॉ. मेधा मेहेंदळे, आदित्य प्रतिष्ठानचे, किरण नाकती हे होते. तर अध्यक्षस्थानी कोंकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष, डॉ. प्रदीप ढवळ सर होते. कार्यक्रमाची संकल्पना शहर अध्यक्ष, ऍड. मनोज वैद्य यांची होती.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात हैशटैग पाउस हा पावसाच्या कविता, गाणी व नृत्याविष्काराचा कार्यक्रम सादर झाला.

या कार्यक्रमाची पूर्ण संकल्पना युवा पिढीतील कलाकार पंकज पाडाळे यांची होती.

शहर अध्यक्ष ऍड मनोज वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मालगुंड दिवाळी अंकाची भूमिका विशद केली.

विनोद पितळे, डॉ प्रतीक्षा बोर्डे, गणेश गारखडकर इत्यादी कलाकारांनी आपल्या हँश टॅग पाऊस या कार्यक्रमाच्या माध्यमातून पावसाची वेगवेगळी रूपे रसिकांपर्यंत पोचवली.

तरुण कलाकार पंकज पाडाळे आणि नृत्यनिकेतनच्या नृत्यांगनांनी अतिशय मेहनतीने आणि जोशात पावसाच्या गाण्यांतून नृत्याविष्कार सर्वांपर्यंत पोहोचवून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

‘हैशटैग पाऊस’ कार्यक्रमानंतर कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेच्या “मालगुंड” डिजिटल दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते आगळ्या वेगळ्या थाटात, कोळी संगीताच्या जोशात संपन्न झाले. “साहित्य वाचत असताना मनाला कोणत्या प्रकारचा आहार दिला पाहिजे समजले पाहिजे तर आपला व्यक्तिमत्व विकास आणि काय वाचतो हे समजायला मदत होते. त्यासाठी आपण लिहिते होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन तन्वी हर्बलच्या डॉ मेधा मेंहेंदळे यांनी विशद केली.

नवीन माणसं एकत्र येऊन ती जोडता आली पाहिजे व मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व टिकवण्यासाठी नवीन माणसांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे तर साहित्यिक निर्माण होतील अशी भूमिका प्रा.डॉ प्रदीप ढवळ यांनी मांडली.

किरण नाकती आणि संदीप माळवी यांनी मराठी भाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मीनल कांबळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मयुरी कदम यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

— लेखन : सिद्धी पटवर्धन. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments